मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकरांचा कोरोना काळात घर-घर शाळा उपक्रम ; आदिवासी वस्तींपर्यत परिस्थितीवर मात करत पोहचविले शिक्षण

जळगाव:आठवडा विशेष टीम― कोरोनामुळे राज्यात सर्वत्र ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू झाले असले तरी आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षाणात अनेक अडथळे येत आहे.या अडचणींचे रड्गाणे न गाता प्रयोगशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी घर…घर..शाळा-शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहोचविले आहे.
गरिबांच्या जीवनाशी स्वेच्छेने कोरोना काळात एकरूप होत संपुर्ण आदिवासी वस्ती असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्वकल्पनेतून आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे घरी जात त्यांचे अंगणातच खाटेवर तर कधी दारी खाली बसून शालेय शिक्षण विभागाने दिलेली पाठ्य पुस्तक तसेच मार्गदर्शिका आणि विविध उपक्रम माध्यमातून कोरणा चे सर्व नियम पाळून मास्क सॅनिटायझर चा वापर करून पालकांच्या मदतीने सहकार्याने घर… घर.. शाळा शिक्षण आपल्या दारी हा अभिनव प्रयोग यशस्वी केला असून गरिबीमुळे मोबाईल स्मार्टफोन नसलेल्या आदिवासी वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाला प्रवाहित ठेवण्याचे काम कोरोणा काळात केल्याने जळगाव जिल्ह्यातून आदिवासी वस्तीवरून एक धडपडी शिक्षक किशोर पाटील कुंझर कर यांनी सुरू केलेल्या व गरिबांच्या शिक्षणासाठी covid-19 कोरोणाच्या परिस्थितीत परिणामकारक ठरलेल्या घर..घर..शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रमांची या नावीन्यपूर्ण प्रयोगाची राज्य व देशपातळीवर स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम म्हणून दखल घेतली गेली आहे. राज्याचे शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील प्राथमिक विभागाचे संचालक जगताप साहेब त्याच जोडीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील , राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार साहेब,पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे,त्याच जोडीने शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी, ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ रंजना ताई पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भा शि अकला डे , पंचायत समितीचे सभापती अनिल महाजन व सर्व सदस्य गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील विकास पाटील नरेंद्र चौधरी शिक्षण विस्ताराधिकारी जे डी पाटील आदींसह अनेकांनी हा उपक्रम म्हणजे किशोर पाटील कुंझरकर या सर्जनशील शिक्षकाने परिस्थितीनुसार उचललेले सुयोग्य पाऊल असून खऱ्या अर्थाने कोरोना काळात सर्व नियम पाळून स्वतःच्या आरोग्याचा आणि शैक्षणिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा समन्वय साधत उचललेले प्रेरणादायी पाऊल असल्याचे म्हटले. आदिवासी वस्तीवर पालकांकडे मोबाईल नसल्याने दोनच पालकांकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील आणि कालू पवार यांचेकडे मोबाईल फोन असल्याने त्यांची वस्तीवर शिक्षण मित्र म्हणून नेमणूक मुख्याध्यापक या नात्याने किशोर पाटील यांनी केली आणि दररोजचा प्राप्त अभ्यासक्रम त्यांच्या मोबाईल वर टाकून सर्वान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला यामधील ही अडचण लक्षात घेता त्यांनी स्वतः आदिवासी वस्तीवर घरोघरी जाऊन घर.घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा प्रयोग राबविला. आदिवासी समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात व विकासाच्या प्रवाहात यावे हा मूळ हेतू असून त्या दृष्टिकोनातून केंद्र शासन व राज्य शासन शिक्षण सर्वत्र सुरू राहण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमधून प्रेरणा घेत कृतीयुक्त आदर्श निर्माण करणाऱ्या किशोर पाटील कुंझरकर यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एक प्रकारे राज्यात सर्वत्र शिक्षण सुरू असल्याचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा असून आदिवासी पालकांचे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य पालक मित्र,सहकारी, सर्व शिक्षक संघटना, ग्रामपंचायत आदीसह सर्व त्यांना मिळत असलेली साथ अनमोल आहे.यापूर्वी देखील त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळई येथे स्वेच्छेने सेमी इंग्रजी माध्यमाची सर्वात अगोदर राज्यात सर्वप्रथम सुरुवात केली होती सुरुवात केली होती. सतत नवनवीन प्रयोग राबवून शैक्षणिक ,सामाजिक बांधिलकी जोपासणारे आमचे किशोर सर आमच्या आदिवासी वस्तीवर चार वर्षांपासून आले पासून त्यांनी मुलांना जीव लावत शाळेकडे वळते केले. स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावत प्रसंगी अंघोळ करून पदरमोड करून दप्तर वही पेन देत मुलांना शाळेची गोडी निर्माण केली.आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो असे अध्यक्ष सुरेश भील,सुभाष भील,सुनील भील आदींनी म्हटले.उपक्रमाविषयी बोलताना आदिवासी वस्ती असल्याने कटाक्षाने बरेच काही करायचे असून अनेक अडचणीतून मार्ग काढत तीन वर्षात वस्तीला विकासाच्या व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नाला आता हळूहळू गती येत आहे .यासाठी सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने आणि मार्गदर्शनाने वाटचाल सुरू असल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. को रोणा काळात शिक्षण सुरू राहावे यासाठी राज्यातील सर्वच शिक्षक आपापल्या परीने ऑनलाइन पद्धतीने पुढे येऊन काम करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असून त्यातून प्रेरणा मिळाली आहे असे त्यांनी सांगितले. किशोर पाटील कुंझरक र हे राज्य शासनाच्या इंग्रजी विषयाच्या तेजस प्रकल्प अंतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून देखील त्यांची निवड झाल्याने शिक्षकांना इंग्रजी विषयाचे धडे देण्याचे मागील दोन वर्षापासून यशस्वीपणे काम करत असून संता विभागाच्या अंतर्गत तालुका बालरक्षक म्हणून देखील काम करत आहेत.वेध ग्रुपचे सदस्य असून राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कोरोणा काळातील कामामुळे राज्य जिल्ह्यातून सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील,आमदार,सभापती यांनी देखील विशेष पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड शिक्षण संचालक पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील ,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, शिक्षणाधिकारी भा शि अकला डे,राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष अर्जुनराव साळवे अरुण राव जाधव सर्व पदाधिकारी, आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या असून सर्व शिक्षक संघटनांनी,आणि शिक्षकांनी प्रोत्साहन दिले आहे.

गालापूर ग्रुप ग्रामपंचायत असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेचे चार शाळा येतात तगावात एक जिल्हा परिषदेचे उच्च प्राथमिक शाळा व एक उर्दू शाळा आहे. श्रीक्षेत्र पद्मालय येथील एक जिल्हा परिषद शाळा देखील ग्रामपंचायत जालापुर अंतर्गत येते तसेच आदिवासी वस्तीवरील उपक्रम शील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर कार्यरत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गाला पूर ही एक शाळा ग्रुप ग्रामपंचायत गालापुर अंतर्गत कार्यक्षेत्रात येते. सन 2016 17 मध्ये या शाळेवर किशोर पाटील कुंझरकर हे हजर झाले आणि हळूहळू शाळेचं भाग्य उजळत असल्याचे या ठिकाणचे पालक-विद्यार्थी तसेच प्रतिनिधी व शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती द्वारे कळते.अगदी विद्यार्थ्यांचे आंघोळ पांगुळ करण्यापासून सर्वप्रथम मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावत त्यांनी प्रसंगी पदरमोड करून या अवलिया शिक्षकांन मुलांना शाळेकडे वळते केले आणि हळूहळू शाळेचे वातावरण बदलण्यास सुरुवात केली.

आदिवासी वस्तीवरील या विद्यार्थ्यांना इंग्रजी गणिता सह विविध विषयात पुढे आणण्याचे त्यांचे स्वप्न वाखानण्याजोग आहे. कोणी नींदो अथवा काही म्हणो प्रचंड चिकाटी नेत्यांनी शाळेचा बौद्धिक व गुणात्मक विकास व भौतिक विकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून आदिवासी पालकांना ते आपल्या मुलांचे ममतेने काळजी घेणारे कार्य करणारे मातृहृदयी पालक वाटताहेत.

आपल्या दुर्गम भागातील या आदिवासी जिल्हा परिषदेच्या शाळेला सामाजिक चेतना केंद्र बनवण्याचे कार्य किशोर पाटील कुं झर कर यांनी सर्वांच्या सहकार्याने हाती घेतले आहे.त्यांची सातत्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक संघटनात्मक विविध क्षेत्रात धडपडीने पुढाकार घेऊन भरीव कार्य करण्याची बांधिलकी व स्वभाव सर्वांना भावत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.