पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा या गावात अवैधरित्या गावठी दारू विक्रेता दादाराव भास्कर पवार दारु विक्री करतानाचे व्हिडिओ फुटेज दि. २० आगस्ट रोजी रात्री ९ वाजता सोशल मीडिया वर व्हायरल केले होते, याप्रकरणी पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, पाटोदा पोलिस ठाणे व बीट अंमलदार गणेश बाबासाहेब भोसले यांना फोनवरून सांगितले होते, त्यांनी दुस-या दिवशी सकाळी धाड टाकण्याचे आश्र्वासन दिले होते.
धाड टाकली पण दारु आणि आरोपी सापडलाच नाही – पो.हे.का.गणेश भोसले
दुस-या दिवशी दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बीट अंमलदार गणेश भोसले यांनी वाघिरा येथील दादाराव भास्कर पवार यांच्या घरी धाड टाकली असता दारु सापडली तर नाहीच परंतु आरोपी सुद्धा सापडला नाही.
१० सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा, आणि आज आरोपी मुद्देमालासह पकडला, गुन्हा दाखल : डॉ.गणेश ढवळे
वाघिरा येथिल दारूविक्रेते उघड उघड दारू विक्री करतात, दारुबंदी साठी लढणाऱ्या महिलांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करतात,धमकावतात. दि. २० आगस्ट रोजी आमचे सहकारी मित्र कृष्णा बांगर यांनी दारूविक्रेते यांची दारू विक्री करतानाची व्हिडिओ शुटिंग काढून मला पाठवली त्याच वेळी गावात दारूविक्री करायची नाही अशी समजही दिली होती. परंतु दारूविक्री आणि महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व धमकावणे सुरूच होते.
अखेर दि. १ सप्टेंबर रोजी पाटोदा पोलिस ठाणे येथे दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा वाघिरा फाटा येथे डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच दि. १ सप्टेबर रोजी पाटोदा पोलिस ठाणे येथिल बीट अंमलदार गणेश भोसले यांनी रात्री ७ वाजता वाघिरा शिवारात स्वत:च्या घरासमोर आरोपी दादाराव भास्कर पवार वय ३५ वर्षे रा.वाघिरा यांच्या घरावर धाड टाकली , त्यात मुद्देमाल एका पांढ-या रंगाच्या कन्डात २० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू अंदाजे १६ लिटर ,दारू प्रतिलिटर ५० रू प्रमाणे ८०० रु व कनची किंमत १०० रू असा एकुण ९००रु , दि.१ सप्टेंबर रोजी आरोपीने विना परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारू बाळगून तिची चोरटी विक्री करत असताना मिळुन आला म्हणून गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक यांचे आदेशाने पो.ना.१०३ घुमरे यांच्या कडे देण्यात आला.पो.स्टे.पाटोदा – प्रो.गु.र.नं.१९०/२०२०कलम ६५ म.दा.का.फिर्यादी :- गणेश बाबासाहेब भोसले वय ४० वर्षे धंदा:-नोकरी पो.हे./२२० ने.पोलिस स्टेशन पाटोदा ता.पाटोदा मो.नं.९८५०६४२१०९ असे नमुद केले आहे.
एकंदरीत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याचा परिणाम का होईना आरोपींला मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला, पाटोदा पोलिस प्रशासनाचे आभार सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी मानले आहेत.