Last Updated by संपादक
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करून,लिंगायत धर्म प्रसारा सोबतच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी डॉ.शिवलिंग शिवाचार्य स्वामींचे फार मोठे योगदान असून तिर्थक्षेत्र कपीलधार यात्रा त्यांच्या प्रेरणेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर यांनी केले.
भा.शि.प्र शिक्षण संस्थेच्या येथील स्थानिक मंडळाच्या वतीने डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना शुक्रवार,दिनांक 3 सप्टेंबर रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.श्रध्दांजली कार्यक्रम शाळेच्या नेताजी पालकर सभागृहात संपन्न झाला.त्यावेळी अॅड.गिरवलकर हे बोलत होते.त्यांनी आपल्या भाषणात महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून अंबाजोगाई शहरासोबत त्यांची असलेली जवळीक याचा उल्लेख करून अनेक आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमात स्थानिक कार्यवाह बिपिनदादा क्षिरसागर यांनी बोलताना सांगितले की,शिवानंद महाराजांनी स्वातंत्र्य पुर्व काळात संघ परिवार विचार धारेतून काम करतांना सामाजिक समरसता आणि राष्ट्र विचार यातून मानवतावादाची भुमिका लोकांच्या समोर मांडली.पंजाब प्रांतामध्ये त्या काळात संघ विचाराचा प्रसार केला केला.महाराज द्वितीय संघ शिक्षा वर्गात जाणारे कार्यकर्ते होते.राम मंदिर उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते असे त्यांनी सांगून अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.या कार्यक्रमाला डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर,आप्पाराव यादव,रामभाऊ कुलकर्णी,अॅड.मकरंद पत्की, नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,मुख्याध्यापक मंजुळदास गवते,मुख्याध्यापिका सौ.जमुनाबाई राठोड,महेश कस्तुरे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शैलेश कंगळे यांनी केले.तर शांती मंत्र आणि गीत पठण जयेंद्र कुलकर्णी यांनी केले.