सोयगाव : पत्रकाराच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ व जीवे मारहाणीच्या धमक्या देनाऱ्या सरपंच व नातेवाईकांविरुध्द पोलिसात विविध गुन्ह्याची नोंद

Last Updated by संपादक

सोयगाव:आठवडा विशेष टीम―
पत्रकाराच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ व जीवे मारहाणीच्या धमक्या
देनाऱ्या सरपंच व नातेवाईकांविरुध्द पोलिसात उशिरा (दी.३) गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आमखेडा येथील ग्राम पंचायत कार्यालया अंतर्गत अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याची तसेच कोरोना१९ काळात साहित्य खरेदी प्रकरणात लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळ्याच्या जनतेच्या तक्रारी वरून पत्रकार भरत पगारे यांनी बातमी दिली होती. बातमीचा राग मनात ठेऊन आकस बुद्धीने आमखेडा येथील ग्राम पंचायत सरपंच अनिता सुकलेला महाले व त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकार कुटुंबाला घरी येऊन अश्लील शिवीगाळ व कोयत्याने जीवे मारहाण करण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार बुधवारी (दी.२) घडला होता.
अनेक विकास कामात आमखेडा ग्राम पंचायत चोकशी अंती दोषी आढळली आहे. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मा. गट विकास अधिकारी सोयगाव यांनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद औरंगाबादला पाठविण्यात आलेला आहे.मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे बातमीचा राग मनात ठेऊन आकस बुद्धीने आमखेडा येथील ग्राम पंचायत सरपंच अनिता सुकलेला महाले (नाईक),वडील सुकलाल महाले, आई चंद्रकला सुकलाल महाले,भाऊ आकाश सुकलाल महाले, व बहिणी पूजा सुकलाल महाले, आरती सुकलाल महाले असे लोक पत्रकार कुटूंबास शिवीगाळ करून हातात कोयते घेऊन बुधवारी (दी.२) मारहाणीच्या धमक्या दिल्या होत्या.
बातमी का लावतो असे म्हणत आमखेडा येथील सरपंच अनिता सुकलाल महाले व नातेवाईक असलेले आई,वडील,भाऊ,यांच्यासह दोन बहिणी यांनी मिळून बुधवारी (दी.२) पत्रकार भरत पगारे यांच्या अज्ञान मुला-बाळांना राहत्या घरासमोर येऊन गुंडागिरी करीत अश्लील शिवीगाळ व हातात कोयता आणून जीवे मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी वैशाली भारत पगारे यांच्या जबाबाबवरून आमखेडा सरपंच अनिता सुकलाल महाले, सुकलाल महाले,चंद्रकला सुकलाल महाले,पूजा सुकलाल महाले यांच्याविरुद्ध भादवी ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पो.नि. सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिंदे,व पोलीस नाईक दिलीप तडवी पुढील तपास करीत आहेत.

आमखेडा येथील आरोपी सरपंच व त्याच्या नातेवाईकां निषेध व आरोपिंपासून पत्रकार कुटूंबाला संरक्षण देण्याची एकमुखी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ठरावाद्वारे केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.