Last Updated by संपादक
कडा(ता.आष्टी):सिराज शेख― कडा बस्थानकात शांत वातवरण.प्रवाशांची हालचाल दिसुन येत नाही.गावाकडील जिवन वाहीनी म्हनुन सुपरीचित असलेली लालपरी कोरोना सोशल डिस्टन राखत धावत आहे.कोरोना चा आथी॔क झळ आष्टी आगाराला बसलेली आहे.काही प्रमाणात बसेस सुरू झाल्यानंतरही प्रवाशांनी पाठ फिरवल्यांनीया बसला प्रवाशांची प्रतिक्षा कायमच.लाकडाउनमध्ये शिथीलता देउन जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यात कोरोना रूग्न सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासात तितकासा प्रतिसाद न देता सध्या च्या स्थितीला घरातच राहने पसंद केले आहे.लाखो रुपयाचे महामंडळाचे आर्थीक नुकसान झाले आहे.