माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन ,कै.स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानची श्रध्दांजली

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प.पू.राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना येथील कै.स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार,दिनांक 4 सप्टेंबर रोजी श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाईच्या सामाजिक क्षेत्रांत कै.स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठान या संस्था मुख्यप्रवर्तक सुरेंद्र खेडगीकर,मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे,डॉ.सोमनाथ रोडे,अध्यक्ष हरीश देशपांडे,सचिव डॉ.डी.एच.थोरात,कोषाध्यक्ष डॉ.उद्धवभाऊ शिंदे,अंकुशराव काळदाते,प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर आदी मान्यवरांच्या माध्यमातून कार्य करतात.नुकतेच देशाचे तेरावे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी आणि प.पू.राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज (अहमदपूर) यांचे दुःखद निधन झाले.यावेळी अभिवादन करताना सुरेंद्रनाना खेडगीकर म्हणाले की,वसुंधरा रत्न आणि राष्ट्रसंत उपाधीने सन्मानित,महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा व उर्वरित आंध्र प्रदेशातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प.पू.राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी धार्मिक,आध्यात्मिक,सामाजिक व राष्ट्रीय अशा विविध क्षेत्रांत 104 वर्षांचे आयुष्य समर्पित केले.तसेच तुमची भक्ती तुमची श्रद्धा माझे आयुष्य वाढवणारी आहे असे महाराजांनी वेळोवेळी लाखो भक्तांना सांगितले.लिंगायत धर्माचा प्रसार केला.असे खेडगीकर म्हणाले.तर डॉ.डी.एच.थोरात यांनी ही शोकभावना व्यक्त केल्या.प्रास्ताविक करताना प्रा.राम चौधरी म्हणाले की,ज्येष्ठ नेते डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्यासह अनेक भाविक भक्त यांच्या उपस्थितीत 1 सप्टेंबर रोजी प.पू.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे अनंतात विलीन झाले.महाराजांच्या प्रेरणेने पायी दिंडी,कार्तिकी पौर्णिमा उत्सव सुरू झाले,महाराजांनी समाज संघटन,धर्मप्रसार,समाज प्रबोधन केले.अखेरच्या श्वासापर्यंत जगाच्या कल्याणाची काळजी केली.त्यांचे जगणे इतरांसाठी मार्गदर्शक व अनुकरणीय होते.त्यांच्या जाण्याने देशाचे अपार नुकसान झाले आहे.देश एका मार्गदर्शकाला मुकला आहे असे प्रा.राम चौधरी म्हणाले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.