Last Updated by संपादक
अंबाजोगाई (प्रतिनिधी): वेणूताई चव्हाण कन्या माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक देविदास शंकर पवार यांचा चाळीसगाव (जि.जळगाव) येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल देविदास पवार यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
वेणूताई चव्हाण कन्या माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशिल तथा इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक देविदास शंकर पवार हे शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार अन् गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन अतिशय मोलाचे कार्य करीत आहेत.त्यामुळे शाळेचा,गावाचा व पर्यायाने देशाचा आरसा असणारी गुणवान पिढी तयार होत आहे.पवार यांच्या कार्याने राष्ट्र उभारणीला शाश्वत बळ मिळत आहे.म्हणून त्यांच्या
कार्यास प्रेरणा मिळावी याकरीता ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक गणेश राठोड यांनी पवार यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार-2020 ने सन्मानित केले आहे.यापूर्वी पवार यांना 2016 साली इनरव्हिल क्लबचा नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाला आहे.देविदास पवार हे इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक,संशोधक आणि लेखक आहेत.विविध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चासञांत पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.पवार यांच्या निवडीचे संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे,कोषाध्यक्ष सतिश लोमटे,सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापिका शोभाताई गायकवाड,सर्व शिक्षकवृंद,माजी प्राचार्य दगडू चव्हाण,माजी प्राचार्य डॉ.गणपत राठोड,साधन व्यक्ती श्रीधर नागरगोजे,विलास सोमवंशी,शैलेष कंगळे,संतोष बोबडे,बाळासाहेब तांबुरे,सोमनाथ डोंबे,देविदास जाधव,अंबाजोगाई तालुक्यातील इंग्लिश रिसर्च फोरमचे सर्व सदस्य,नातेवाईक आणि मिञ परिवार यांनी स्वागत केले आहे.