Last Updated by संपादक
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पोळ्याच्या दिवशीही मालकासोबत शेतावर राबणाऱ्या बैलाला रविवारी बैलगाडीला जुंपून शेतात जात असतांना अचानक हिरवळीतून आलेल्या दहा फुटाच्या नागाने दंश केल्याने रस्त्यातच या बैलाचा जरंडी ता.सोयगाव येथे रविवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी गणेश चणाल यांनी जानेवारी महिन्यात साठ हजाराला नवीन घेतलेल्या सर्जा-राजा या जोडीतील सर्जाचा रविवारी शेतावर जातांना सर्पदंश होवून मृत्यू झाला आहे.या घटनेत शेतकऱ्याचे रविवारचे कोळपणीचे कामा तर दूरच परंतु बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी जोडीविना झाला आहे.दुसऱ्या बैलाला जोडीदार पाहण्यासाठी या शेतकऱ्याजवळ पैसाच नसल्याने गणेश चणाल या शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.कोरोना संसर्गाचे लॉकडाऊन यामुळे हाताशी आलेल्या या शेतकऱ्याला दुसरा बैल विकत घेण्यासाठी दमडीही खिशात नाही.त्यातच खरीपाचा हंगामाला उत्पन्न नाही.उडीद,मुग झालेल्या अतिपावासात भिजून कोंब फुटल्याने या शेतकऱ्याला उडीद,मुग विक्री करण्याऐवजी या पिकांवर ट्रकटर फिरवावा लागला होता.