औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात केवळ सात कोरोना रुग्ण सक्रीय…

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यात यश संपादन केलेल्या आरोग्य विभागाकडे उपचारासाठी केवळ सात रुग्ण राहिले असून जरंडी कोविड केंद्रातील १३ पैकी सोमवारी पाच रुग्णांना सुती देण्यात आली होती.त्यामुळे तालुक्यातील सात रुग्ण उपचार घेत आहे.

सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता आलेख पाहता तालुका आरोग्य विभागाकडून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यश हाती आले असून जरंडी कोविड केंद्रात सध्या केवळ ७ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.सोमवारी तालुक्यात एकमेव घेण्यात आलेल्या अंटीजन तपासणीत रुग्ण संख्या निरंक राहिली असून सोमवारी एकही सकारात्मक रुग्ण आढळला नाही.तहसीलदार प्रवीण पांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यात १६५ सक्रीय रुग्णांपैकी जरंडी कोविड केंद्रातून १५८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.सोयगाव शहरात कोरोना संसार्गावर नियंत्रणासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे,वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे आदी पुढाकार घेत आहे.

चौकट-सोयगाव तालुक्यात तूर्तास तरी कोरोना संसार्गावर नियंत्रण मिळाले असून यानंतर आता तालुका आरोग्य विभागाकडून प्लाझ्मा थेरपी साठी प्रयत्न सुरु असून तातडीने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची चौकशी करून तालुका आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.श्रीनिवास सोनवणे हे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या भेटी घेवून त्यांना प्लाझ्मा थेरपीसाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे.त्यामुळे सोयगाव तालुका आता प्लाझ्मा थेरपीसाठी जिल्ह्यात पुढे सरसावला असून सोयगाव तालुक्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या याद्या तातडीने जिल्हा परिषद औरंगाबाद यांना पाठविण्यात आल्या आहे.

जरंडी कोविड केंद्रातून सोमवारी पाच रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.यामध्ये गोंदेगाव-४ आणि तिडका-१ अशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आहे.यावेळी डॉ.रंमेश चव्हाण,हर्शल विसपुते,गोपाल मिसाळ आदींच्या हस्ते कोरोनामुक्तचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.