सोमवारी जिल्हा परिषदेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी करणार काळी फीत लावून आंदोलन-जिल्हाध्यक्ष परमेश्वर पवार,जिल्हासचिव महेश रोकडे यांची माहिती

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्हा परिषदेसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी उद्या सोमवार,दि.7 सप्टेंबर रोजी काळी फित लावून आंदोलन करणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेचे अध्यक्ष परमेश्वर पवार व संघटनेचे बीड जिल्हासचिव महेश रोकडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेने रूजु झालेले चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या अनेक प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासुन वेगवेगळया चतुर्थश्रेणी संघटनेच्या माध्यमतुन शासनांच्या ग्रामविकास विभागाला निवेदने देऊन चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात आल्या आहेत.परंतु,ग्रामविकास विभागांकडुन सदर निवेदनांची गंभीरता पुर्वक दखल घेण्यात आलेली नाही.शासनाच्या इतर विभागांचे सुधारीत सेवाप्रवेश तयार होऊन 2016 या वर्षांपासुन त्यांची अंमलबजावणी सुध्दा सुरू झालेली आहे.परंतु,ग्रामविकास विभागांचे अद्याप सेवा प्रवेश नियम तयार झालेले नाहीत.ते काम कासव गतीने सुरू आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेने या सर्व गोष्टींचा निषेध म्हणुन सोमवार,दि.7 सप्टेंबर रोजी काळी फित लावून रोजचे नियमित काम करणे अशा स्वरूपाचे आंदोलन करण्याचे निवेदन शासन दरबारी दिलेले आहे.या संघटनेच्या व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेच्या मागण्या एकच असल्या कारणाने या आंदोलनाला पाठींबा देऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप सर्जेराव चौधरी (पुणे) व संघटनेचे राज्यसचिव मुकुंद विनायकराव तुरे (बीड) यांनी राज्य सरकारी गट – ड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब पठाण (मुंबई) यांच्या मार्गदर्शनानुसार घेतला आहे.त्यामुळे संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या दि. 07/09/2020 रोजी रोजच्या नियमित कामांत कुठलाही बदल न करता काळी फीत लावून काम करणे अशाप्रकारचे आंदोलन बीड जिल्ह्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी करणार आहेत.आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.1) शासनांच्या इतर विभागांच्या तुलनेत जिल्हा परिषदेकडे कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या वेतन श्रेणीतील तफावती दुर करून इतर विभागांच्या बरोबरीनेच जिल्हापरिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या पण,वेतनश्रेणी मध्ये समानता आणणे (उदा.शासनाच्या पशुसंवर्धन विभागांत कार्यरत असलेल्या व्रणोपचारक या पदांची वेतनश्रेणी 18000/- ते 56900/- अशी असुन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांत कार्यरत असलेल्या व्रणोपचारक या पदाची वेतनश्रेणी 16600-52400 अशी आहे हि तफावत दुर करणे,चतुर्थश्रेणी संवर्गाची वेतनश्रेणी केंद्राप्रमाणेच 18000/- रु.करणे),2) सेवा प्रवेश नियम 2019 हे लवकरात लवकर निर्गमित करून जिल्हापरिषदेच्या सरळ सेवेने रूजू परिचर वर्गांचे पदोन्नतीचे प्रमाण 40:50:10 करण्याचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करून पदोन्नतीची रखडलेली पक्रिया तात्काळ सुरु करणे.,3) ग्रामपंचायत कर्मचा-याप्रमांणेच जिल्हा परिषदेच्या सरळ सेवेने रूजू झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना सुध्दा शैक्षणिक पात्रतेनुसांर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,आरोग्यसेवक,ग्रामसेवक,वरिष्ठ सहाय्यक यासारख्या पदांवर पदोन्नतीनीसाठी अथवा समायोजनासाठी 10% वाटा आरक्षित करणे.,4) चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे निवृत्ती नंतरचे व सेवेत असताना सर्व फरकांची देयके तात्काळ अदा करण्यात यावीत.या मागण्यांचा गांभीर्यांने विचार करुन शासनांने कार्यवाही करावी यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.शासनाने वेळीच आमच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.हे आंदोलन यशस्विरित्या होण्यासाठी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संजय पवार,जिल्हाअध्यक्ष परमेश्वर पवार,जिल्हासचिव महेश रोकडे,जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम गायवळ,महिला उपाध्यक्ष श्रीमती जनाबाई गोसावी,जिल्हा उपाध्यक्ष रमेश माने,सतिष शिंदे,बापुराव आंधळे,जिल्हा महिला संघटक श्रीमती माळवे अनिता,जिल्हा सहसचिव विठ्ठल आतकरे,धनंजय एस. के,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख मिर्झा डब्ल्यु.एस.जिल्हा संघटक उमेश दळवी,रमेश पारवे.दत्तात्रय भावठाणकर,डी.डी.वाघमोडे,जिल्हा संपर्कप्रमुख कोकटवाड एस.एम., सानप.पी.एन.,कार्यकारी सदस्य ए.एस.नवले,एस.जी.वखरे,महारुद्र वखरे,पी.डी.उजगरे व जिल्हा कार्यकारीणीचे सर्वच सदस्य परिश्रम घेत आहेत.या आंदोलनाला “राज्य सरकारी गट-ड कर्मचारी महासंघ” “ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन” व “महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना” या तीन वेगवेगळया संघटनांचा देखील पाठिंबा असुन जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेची चतुर्थश्रेणी संघटना देखील या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख डब्ल्यु.एस.मिर्झा यांनी दिली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.