अंबाजोगाई (प्रतिनिधी):
शहरातील महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.आण्णासाहेब लोमटे यांना शनिवार,दिनांक 5 सप्टेंबर रोजी श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अंबाजोगाई शहरातील हॉटेल साई सुरभी,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.आण्णासाहेब लोमटे यांना शनिवार,दिनांक 5 सप्टेंबर रोजी श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रारंभी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शैलेश स्वामी,प्रसाद कोठाळे यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.तर महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यावेळी म्हणाले की,राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा शिष्य संप्रदाय हा महाराष्ट्र,कर्नाटक,
तेलंगणा आणि उर्वरित आंध्र प्रदेशात सर्वदूर पसरलेला आहे.लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प.पू.राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आध्यात्मिक क्षेत्रांत मोठे योगदान आहे.राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य महाराजांनी केले आहे.आपले संपूर्ण
आयुष्यच त्यांनी समाज संघटन,धर्मप्रसार,समाज प्रबोधनासाठी समर्पित केले.लिंगायत धर्माचा सर्वदूर प्रसार केला.महाराजांचे विचार आणि कार्य हे भावी पिढ्यांना प्रेरक आहे.तर अंबाजोगाईतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.आण्णासाहेब लोमटे यांचा बीड जिल्ह्यातील विधी क्षेत्रात दबदबा होता.कुशाग्र बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या बळावर त्यांनी अनेक किचकट खटले यशस्वीपणे हाताळले.ॲड.आण्णासाहेब लोमटे आणि विजय हे जणू न्यायालयीन खटल्यांचे समीकरणच बनले होते.अनेक वर्षे त्यांनी अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्षपदही भूषविले.तसेच अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितिचे अध्यक्षपद भूषविले.अंबाजोगाई येथे जिल्हा व सत्र न्यायालय स्थापने मध्ये त्यांचा मोठा सहभाग होता व जिल्हा न्यायालयाचे इमारतीचे उदघाटन प्रसंगी ते अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष होते.अंबाजोगाई शहराच्या सामाजिक जडणघडणीत त्यांचे अमुल्य योगदान आहे.त्यांनी आपल्या कार्यातून अंबाजोगाईचे नांव उंचावले.या दोन्ही मान्यवरांचे व्यक्तीमत्व हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे विनोद पोखरकर म्हणाले.प्रास्ताविक शाहीर मामा काळे यांनी तर सुञसंचालन अमोल व्यवहारे यांनी करून उपस्थितांचे आभार योगेश पोखरकर यांनी मानले.यावेळी महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सदस्य मनोज बरदाळे,संतोष काळे,किशोर ढगे,राजेंद्र पोखरकर,कैलास व्यवहारे,अमित स्वामी,कल्याण गायके,आप्पा मंगे,स्वप्निल तोडकर,सुनिल कलशेट्टी,गणेश रूद्राक्ष,प्रमोद पोखरकर,प्रदीप वाघमारे,वैभव पोखरकर,गौरव लामतुरे यांची उपस्थिती होती.