कडा:सिराज शेख―
आज जवळ जवळ चार-पाच महिण्याचा कालावधी कोरोना या आजाराने सर्व जगाला वेठीस धरलय पण आपल्या लोकाना अजून कळलं नाही कि आपल्या ला या रोगाशी लढायचं आहे रोग्यांशी नाही.
आज या आजाराशी लढताना आपण सर्व लोक ज्या पद्धतीने काही ठिकाणी त्या लोकांना आणि त्यांच्या घरच्यांना वागवतो. ते खूप वेदनादायक आहे मुळात रुग्ण आणि नातेवाईक याना त्या रोगापेक्षा लोकांच्या त्या त्रासदायक नजरा आणि वागण्याची भीती वाटत आहे.
याउलट जर आपण त्यांचा आधार झालो त्यांना फोन करून धीर दिला आणि त्यांच्या नातेवाइकांचा आधार बनलो तर कोरोना रोगाची ताकद कमी करताना खूप मोठा हातभार लागेल.
त्यांना प्रेम आपलेपणा आणि शब्दांचा आधार पुरेसा नक्कीच आहे. लवकरच या कोरोना वर लस येईल पण आपण कसे वागलो हे मात्र कायम त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना लक्षात राहील.
शेवटी आपले संस्कार आणि संस्कृती जगात ओळखली जाते आपलेपणा साठी तेव्हा जगूया आणि जगवूया..
कोरोनाल घाबरुन न जाता त्याचा सामना करा नियमित मास्कचा वापर करा .सॅनिटाझरचा वापर करा.प्रशासनाच्या नियमांचे पालन करा.नक्कीच कोरोना संपुष्टात येईल.