अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील मौजे पोखरी येथील बहुजनांची अस्मिता असणारे चौक नुकतेच पाडण्यात आले.यामुळे बहुजनांची आस्था असणा-या प्रतिकांचा हेतुस्पर अवमान प्रकरणी भीम आर्मीच्या वतीने शुक्रवार,दिनांक 11 सप्टेंबर रोजी निदर्शने करणार आहे.याबाबत भीम आर्मीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की,अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पोखरी येथील बहुजनांची अस्मिता असणारे चौक नुकतेच पाडण्यात आले.यामुळे बहुजनांची आस्था असणा-या प्रतिकांचा हेतुस्पर अवमान प्रकरणी अमर प्रभाकर वाव्हळे यांनी भीम आर्मीच्या माध्यमातून सदर प्रकरणात अंबाजोगाई
येथील तहसीलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी,गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक (ग्रामीण),ग्रामविकास अधिकारी पोखरी,सरपंच पोखरी यांनी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून जे चौक पाडले म्हणून यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध अधिनियम फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवार,दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी,कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना अॅड.शिरीष कांबळे,प्रशांत आचार्य (प्रदेश सचिव,भीम आर्मी महाराष्ट्र राज्य),सिद्धार्थ मायंदळे (जिल्हा प्रमुख,बीड),मिलिंद ढगे,परमेश्वर जोगदंड,धीमंत राष्ट्रपाल,अशोक पालके,अमोल वाघमारे,नितीन सरवदे,ब्रिजेश इंगळे व इतर कार्यकर्ते हे उपस्थित होते.
निदर्शनात सहभागी व्हा ― आवाहन
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पोखरी येथील बहुजनांची अस्मिता असणारे चौक पाडण्यात आले.यामुळे बहुजनांची आस्था असणा-या प्रतिकांचा हेतुस्पर अवमान प्रकरणी भीम आर्मीच्या माध्यमातून सदर प्रकरणात निवेदनात नमूद सर्व जबाबदार महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवार, दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी, कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.तरी सर्व मानवतावादी,आंबेडकरवादी पक्ष व संघटना यांना आवाहन करण्यात येते की,आपण सर्वांनी या निदर्शनात सहभागी व्हावे.
―प्रशांत आचार्य (प्रदेश सचिव,भीम आर्मी,महाराष्ट्र राज्य)