अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
मयत पिराजी काळे यांचा शनिवारी मारहाणीत मृत्यू झाला आहे.या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी युवा आंदोलनच्या वतीने अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांना सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणाची निवेदनात नमूद केलेली हकीकत अशी की,सामाजिक कार्यकर्ते पिराजी वामन काळे (वय 30 वर्षे,रा.कौडगाव घोडा) यांचा शनिवार,दिनांक 5 सप्टेंबर रोजी नाथ्रा पाटीजवळ सबदराबाद शिवारात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला.या मृत्यू प्रकरणात बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी “युवा आंदोलन” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके हे पिडीत काळे कुंटूबियांच्या बाजुने उभे राहिले आहेत.मयत पिराजी काळे यांना मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा यासाठी ते लढा देत आहेत.निवेदनात मयत पिराजी काळे यांचा शनिवारी मारहाणीत मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे उशिरा गुन्हा दाखल करून कर्तव्यात कसूर करणा-या जबाबदार व संबंधित पोलिस अधिकारी यांचेवर अॅट्रासिटी अॅक्ट कलम चार (4) प्रमाणे गुन्हा दाखल करावा.तसेच या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करण्यात यावे असे नमूद केले आहे.या प्रकरणी मयत पिराजी काळे यांचे कुटुंबियांनी पाठपुरावा करून पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यानुसार सिरसाळा (ता.परळी) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.गुन्हा दाखल झाला.परंतू,सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी अशोक पालके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदरील निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके,धिमंत राष्ट्रपाल,राम जोगदंड,अरविंद शिंदे,हनुमंत गायकवाड,दिलीप पालके यांच्या स्वाक्ष-या आहेत.निवेदनाची प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री,सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्हाधिकारी, बीड यांना माहितीस्तव देण्यात आले आहे.
सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करा―अशोक पालके
मयत पिराजी काळे मृत्यू प्रकरणात गुन्हा तर दाखल झाला.परंतू,अद्यापही आरोपींवर म्हणावी तशी कारवाई झालेली नाही.या घटनेत जे आरोपी आहेत.त्यांची सखोल चौकशी करावी.जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी.तसेच मयत पिराजी काळे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.जर शासन व प्रशासन सदरील घटनेतील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करेल तर युवा आंदोलन संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल त्यास शासन व प्रशासन जबाबदार असेल.असा इशारा युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांनी दिला आहे.