Last Updated by संपादक
जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जामनेर तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतने प्रथमच शिक्षक दिन शाळेत सोशल डिस्टींगचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पुंडलिक पाटील हे होते सुरूवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील. पदवीधर शिक्षक देवाजी पाटील, उपशिक्षक रविंद्र चौधरी, विकास वराडे, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, छाया पारधे, रामेश्वर आहेर यांचा यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, रुमाल, टोपी,गुलाबपुष्प देवून करण्यात आला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतने प्रथमच शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेतील सर्व शिक्षकांच्या सन्मानाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करून धन्यवाद दिले.
यावेळी शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नाना सुरळकर यांनी मनोगत व्यक्त केले व अध्यक्षिय भाषण समाधान पाटील यांनी केले. . या कार्यक्रमात समीक्षा पांडुरंग भोई या विद्यार्थीनीने १० वी च्या परिक्षेत ८४ टक्के गुण मिळवून यश मिळविले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सरपंच समाधान पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर सुरळकर, पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी डोंगरे, अमृत दांडगे, नाना सुरळकर, सौ. वैशाली गाडीलोहार, सौ. रुपाली उघडे, सौ. सविता भोई,सौ. सुनीता गाडीलोहार आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी.टी.पाटील यांनी केले व आभार जयंत शेळके यांनी मानले.