अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे आव्हान उभे राहिलेले असताना.एवढेच नाही तर एकिकडे काही खाजगी डॉक्टर यांच्या सेवेबाबत उलट सुलट चर्चा असताना ? दुसरीकडे अंबाजोगाई शहरात मात्र सचिन गौरशेटे यांनी पद्मावती क्लिनिक (रक्त तपासणी प्रयोगशाळा) गेल्या अनेक महिन्यांपासून 24 तास सेवा सुरू ठेवली आहे.सर्वसामान्य रूग्णांना रक्त तपासणीसाठी फार मोठा दिलासा मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिक,मधुमेह रूग्ण यांना या क्लिनिक द्वारे घरपोहोच सेवा मिळत असल्याने.संकटात सामाजिक दायित्व आणि जबाबदारी कशाप्रकारे पार पाडली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.सचिन गौरशेटे हा तरूण ग्रामीण भागातील असून,अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरात त्याची पद्मावती क्लिनिक लॅब आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे आव्हान उभे आहेत.संकटाची भीती सर्वस्तरांतील लोकांना असल्याने,खाजगी डॉक्टर सुद्धा अनेक शहरात आपलं क्लिनिक उघडायला तयार नाहीत.अशा परिस्थिती मध्ये सचिन
गौरशेटे या तरूणाने सामाजिक दायित्व आणि परोपकारी सेवाभाव ठेवून आपलं क्लिनिक 24 तास चालू ठेवले आहे.सर्वसामान्य रूग्णांना रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर सुद्धा अनेकदा मानसिक दिलासा मिळतो.गौरशेटे यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिक.मधुमेहाचे रूग्ण किंवा इतर आजाराने त्रस्त असणा-या रूग्णांना रक्त तपासणीचे अहवाल घरपोहोच सेवा देण्याचे कार्य गेल्या दोन महिन्यांपासून सुरू ठेवले आहे.लॉकडाऊन काळात सुद्धा गरजेनुसार या क्लिनिक मधून सर्वसामान्य रूग्णांना सेवा मिळत होती.सध्या या क्लिनिक मधून 24 तास सेवा सुरू आहे.मधुमेहाच्या रूग्णांना महिन्याकाठी नियमित साखर तपासणी ही करावी लागते.संकटाच्या पार्श्वभूमीवर भीतीपोटी रूग्ण दवाखान्यात जाण्यासाठी मागे पुढे पाहतात.मात्र काही डॉक्टर केवळ मेसेजवर ट्रिटमेंट देत असल्याने,रक्त तपासणी अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे.अशा परिस्थितीत सचिन गौरशेटे हे अंबाजोगाई शहरामध्ये सामाजिक दायित्व ठेवून आपली जबाबदारी पार पाडत असल्याने.सचिन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.विशेषता: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गौरशेटे यांनी सर्व प्रकारच्या रक्त चाचण्यांचे दर हे माफक ठेवले आहेत.