सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३२ व्या जयंती अर्थात शिक्षक दिनानिमित्त शासन मान्यताप्राप्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कोरोना (कोविड-१९) महामारी च्या काळात शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रभरातून ४१ उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.त्यामध्ये पी.टी.पाटील यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकरखेडा येथे तर अनिल माळी यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा खडकी येथील कार्यरत गावात,शाळेत मास्क प्रात्यक्षिके,कोरोना तसेच स्वच्छता बद्दल जनजागृती,ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण,शाळा बंद पण शिक्षण सुरू,गृहभेटी,शाळेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया,ऑनलाईन कोर्स,रेशन वाटप अशा प्रकारचे कार्य करून योगदान दिल्याबद्दल त्यांना या संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
माजी जिल्हाधिकारी तथा महसूल उपायुक्त बी.जी.वाघ, अध्यक्ष एस.एम.उज्जैनकर , उपाध्यक्ष विनायक वाडेकर ,सचिव प्रमोद पिवटे यांनी छाननी व पारदर्शी निवड प्रक्रिया पूर्ण करून पुरस्कार जाहीर केले आहे.
पी.टी.पाटील व अनिल माळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.