कडा ता.आष्टी:सिराज शेख― ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे यात. शेतकऱ्यांची धावपळ झाली. बऱ्याच विश्रांती नंतर गर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. कडा परिसरामध्ये दहा- पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा दमदार वरून राजाचे आगमन झाल्याचे दिसले. त्यामुळे अशा प्रमाणात शेतकरी राजा सुखावले चित्र दिसत आहे बऱ्याच दिवसाचा अवधी होऊन गेला होता. जसं काही इंद्र देवाने आपल्याकडे पाठ फिरवली का असे वाटत होते. शेतातील पिके पाण्याअभावी काहीसे कोमजल्यासारखे वाटत होते. मात्र अचानक झालेल्या दमदार पावसाने. नदीला व तलावाला पाणी आले. शेतकरी व नागरिक काही सुखावलेला दिसत आहेत. गेल्या दोन चार दिवसा पासून मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आलेली होती. त्यामुळे उष्णतेने ग्रासलेले नागरीक आलेल्या पावसाचा आनंद घेत आहे.