कडा:सिराज शेख― कडा शहरातील सुप्रसिद्ध ज्वेलर्स फुलचंद पुनमचंद भंडारी सराफ शॉर्ट सर्किटमुळे आगीत जळुन खाक झाल्याची घटना आज घडली आहे. दिनांक 12 सप्टेंबर सकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली आहे. परंतु दुकान पूर्ण पणे जळुन भस्मसात झाले व त्यात करोडोचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.