अंबाजोगाई (प्रतिनिधी): पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा सचिवपदी स.का.पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पाटेकर यांच्या नियुक्तीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
पुरोगामी पञकार संघाच्या वतीने स.का.पाटेकर यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपञात नमूद केले आहे की,आपले सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदान पाहिले असता,आपण संघटनेच्या विचाराधीन राहुन संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.त्याबद्दल आपले पुरोगामी पत्रकार संघाचे वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.आपले योगदान सदैव संघटना वाढविण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरेल.तरी आपण महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांच्या हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तत्पर रहाल अशी आम्ही खात्री बाळगतो.अशी अपेक्षा व्यक्त करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.स.का.पाटेकर यांनी 1994 पासून पञकार म्हणून बहुजन नायक, साप्ताहिक आवाज, साप्ताहिक फकिरा, सायंदैनिक प्रतिध्वनी,लोकसंकेत,महानायक,हिंदुस्थान,संविधान सम्राट,माजलगाव टाईम्स, लोकनेता, लोकप्रश्न, अंबाजोगाई वार्ता या दैनिक वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम केले आहे.मागील सात वर्षांपासून ते संपादक म्हणून जय गणनायक हे स्वता:चे वर्तमानपञ चालवतात.यापूर्वी पाटेकर हे मराठी पञकार परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष होते.त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श पञकार आणि लोकजागर सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे.पाटेकर यांना सामाजिक क्षेत्राचा चांगला अनुभव आहे.पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा सचिवपदी स.का.पाटेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी,राज्य उपाध्यक्ष प्रा.दशरथ रोडे,राज्य संघटक
भागवत वैद्य,विभागीय अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, विभागीय उपाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ, जिल्हाध्यक्ष प्रा.बालाजी जगतकर, जिल्हाकार्याध्यक्ष संजय जोगदंड,जिल्हाउपाध्यक्ष सुरेश उदार आदींनी स्वागत व अभिनंदन केले आहे.