राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोयगाव येथे कोविड केंद्र बांधकामाचा शुभारंभ

सोयगाव दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोविड केंद्र बांधकामाचा शुभारंभ राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार , जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी जरंडी येथील कोविड सेंटर ची पाहणी करून तेथील डॉक्टर व आरोग्य सुविधेची पाहणी केली. तसेच येथील कोविड रुग्णशी त्यांनी संवाद साधला. निम्बायती येथील नियोजित कोविड सेंटर ची पाहणी केल्यानंतर सोयगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व खबरदारी चा उपाय म्हणून आता गावागावात जाऊन नागरिकांच्या तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासणी करण्यावर भर द्यावा , जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करावी यासाठी जनजागृती करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेवून एक टीम तयार करून सदरील अभियान राबवावे, पन्नास वर्षांवरील लोकांची प्रमुख्याने तपासणी करण्यात यावी . ताप व सर्दी सारखे लक्षणे असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी . कोविड रुग्णांना वेळेवर उपचार व जेवण मिळते का याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. याकामी प्रशासन सर्वतोपरी मदत करणार अशी ग्वाही देत कोरोनाचा पुढील धोका लक्षात घेता प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी व बाजाराच्या ठिकाणी तपासणीला सुरुवात करा. यासाठी मुबलक टेस्टिंग किट उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगत कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

कोरोना तपासणी केल्यानंतर आपण पॉझिटिव आल्यास प्रशासन आपल्याला ताब्यात घेईल असा लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे जर पॉझिटिव आल्यास ग्रहविलगीकरण करून घरी राहून उपचार घेता येतो तसेच वेळीच उपचार मिळाल्याने या रुग्णांचा पुढील धोका टळतो यासाठी जनजागृती केली पाहिजे असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले म्हणाले .

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालया जवळील पटांगणात नव्याने कोविड केंद्र बांधकामाचा शुभारंभ आज रोजी संपन्न झाला. मुंबई – पुणे सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने कोविड केंद्र उभारण्यात आले त्याच धर्तीवर सोयगाव येथे एक महिन्यात सर्व सुविधायुक्त कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाच्या संकटात सोयगाव येथील रुग्णांना उपचारासाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, युवा नेते अब्दुल समीर, जि.प.चे बांधकाम सभापती किशोर बलांडे , महिला व बालविकास सभापती मोनाली राठोड, माजी जि. प. सदस्य प्रभाकर काळे, नगराध्यक्ष कैलास काळे, डॉ. अस्मिता पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, शहरप्रमुख संतोष बोडखे, शिवप्पा चोपडे, पंचायत समिती सभापती रुस्तूलबी उस्मान खाँ पठाण ,सिल्लोड कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढ़े, उपसभापती नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे ,शिवसेना सिल्लोड शहर प्रमुख रघुनाथ घरमोड़े,अशोक सूर्यवंशी, कौतिक्राव मोरे ,नगरसेवक विठ्ठल सपकाळ, धरमसिंग चव्हाण, दारासिंग चव्हाण, बाबुराव चव्हाण, सलीम पठाण ,श्रीराम चौधरी, यांच्यासह उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, तहसीलदार प्रवीण पांडे ,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे ,तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास सोनवणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे श्री. गुडसुरवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता कल्याण भोसले, जि.प.पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रमेश कोईलवार, आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.