सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― बनोटी मंडळात झालेल्या ढगफुटीच्या पावसात नदी काठच्या शेती शिवाराचे १०० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण यांनी सायंकाळी उशिरा दिली.बाधित पिकांचे पंचनामे सुरु असून अद्याप बाधित क्षेत्राचा आकडा हाती आला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
बनोटी मंडळात सात गावात अचानक ढगफुटीचा चार तासांचा पावूस झाला होता.यामध्ये केळी आणि कपाशी पिअकंचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल कृषी आणि महसूलचं पथकांनी सायंकाळी उशिरा जीलः प्रशासनाला सादर केला असून नुकसानीची माहिती मिळताच उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण,याह्सिलदार प्रवीण पांडे यांनी संयुक्त पाहणी दौरा करून पिकांच्या नुकसानीची व जनावरांच्या पुरात वाहून झालेल्या मृत्यूची माहिती घेतली व महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांकडून रात्री उशिरापर्यंत संयुक्त पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले.
बनोटी परिसरात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश―
बनोटीसह मंडळातील नदीकाठच्या गावांना तालुका प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून रात्री पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांनी सतर्क राहून तातडीने सुरक्षितस्थळी हलण्याचा सूचना देण्यात आल्या आहे.
बोंडासह कपाशी पिके आडवे-
बनोटी मंडळात कपाशी पिकांच्या बोंडात कापूस भरलेला असतानान हा कापूस बोंडाबाहेर उमलण्याआधीच पावसाने मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बोंडासह कपाशीच्या पऱ्हांटया पुराच्या पाण्यात वाहून आल्या आहे,कपाशी लागवडीचे बनोटी मंडळातील क्षेत्र उजाड झाले आहे.
बनोटी मंडळातील बनोटी,मुखेड,घोरकुंड,पळाशी,वाडी,गोंदेगाव आणि वरठाण या सात गावात ढगफुटीचा फटका बसला असून नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. ― प्रवीण पांडे ,तहसीलदार सोयगाव