अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संकटकाळी स्वता:चा जीव धोक्यात घालून गरजू रूग्णांना आरोग्य सेवा देणा-या आणि कोरोना मयतांवर वेळेत अंत्यसंस्कार होण्यासाठी पुढाकार घेणा-या शासकीय रूग्णवाहिकांचे वाहनचालक आणि खाजगी रूग्णवाहिकांच्या मालक तसेच वाहनचालकांचा महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
येथील महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी शनिवार,दिनांक 12 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय परिसरातील कोरोना संकटकाळात स्वता:चा जीव धोक्यात घालून गरजू रूग्णांना,कोरोना बाधितांना घरून रूग्णालयात घेऊन येणे,उपचारानंतर घरी सोडणे तसेच वेळेत उपचार मिळावेत,24 तास दिवस-राञ एका योद्ध्यासारखे कार्य करून तत्पर आरोग्य सेवा देणा-या आणि दु:खद प्रसंगी कोरोना मयतांवर वेळेत अंत्यसंस्कार होण्यासाठी पुढाकार घेणारे निकेश जगदाळे,बालाजी जगदाळे,भीमराव आदमाने,पुरुषोत्तम ओव्हाळ,अमजद पठाण,हाब्बुभाई पठाण,पप्पू घोडके या रूग्णवाहिकांच्या मालक आणि वाहन चालकांचा सन्मान केला.यावेळी रूग्णवाहिकांच्या वाहन चालकांना आम्ही अंबाजोगाईकर म्हणून एक पञ देवून विनंती केली की,कृपया रूग्णाच्या घरासमोर सायरन वाजवू नये.कारण,अनेक घरात यामुळे खूप भितीदायक वातावरण निर्माण होऊन त्याचा परिणाम परिसरातील लोकांच्या मनावर होत आहे.यावेळी डाॅ.विकास सत्वधर, गजानन देशपांडे, सागर उबाळे,कल्याण गायके,शुभम जोगदंड हे उपस्थित होते. विनोद सिद्रामआप्पा पोखरकर हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते माजी मंञी जयदत्तआण्णा क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक आहेत. दिवंगत शिवसैनिक वसंतआप्पा पोखरकर यांचा वारसा जोपासत लॉकडाऊन काळात पोखरकर यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासली.आज सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र यायला हवे या भूमिकेतून गरजूंना मोफत जेवण, अन्नधान्याचे कीट, मास्क,सॅनिटायझर वाटप,सॅनिटायझेशन फवारणी ही केली. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले यात स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील रक्तपेढी व रूग्णालय परिसरात कोरोना प्रादुर्भाव होवु नये म्हणून औषध फवारणी (सॅनिटायझेशन) केली.अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धे पोलिस बांधवांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणा-या “आर्सेनिक अल्बम” या होमिओपॅथीक औषधी गोळ्या व सॅनिटायझर,स्प्रे आदींचे वाटप केले. तसेच लॉकडाऊन काळात हिंगोली जिल्ह्यातील मजुर हे अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या सिमेवर जंगलात अडकून पडले होते त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले.व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून सुरक्षित कसे राहता येईल हे सांगितले. अंबाजोगाई नगरपरिषद परिसरा मध्ये दररोज शेकडो लोक ये-जा करतात. पालिका कर्मचारी यांच्यासाठी 2 तसेच उपोषण आंदोलन कर्त्यांना 1 सॅनिटायझर संयंञ उपलब्ध करून दिले. नगरपरिषदेच्या स्वच्छता आणि विद्युत विभागातील कंञाटी कर्मचारी यांना मास्क (एन-95) दिले.यामुळे कोरोना संकटकाळात जनसेवेचा विचार पोखरकर यांनी हॉटेल साई सुरभीच्या माध्यमातून पुढे आणला आहे.