अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समावून घ्यावे अशा मागणीचे निवेदन सोमवार,दिनांक 14 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना अप्पर जिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांचे मार्फत देवून आरक्षण प्रश्नी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.राज्य मंञी मंडळातील मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडण्यास राज्यसरकार अपयशी ठरले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संभाजी ब्रिगेड व अनेक मराठा संघटनांनी अंदोलने व उपोषणे केली. अंदोलना दरम्यान मराठा युवक काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षण मिळावे यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.(तसेच अनेक तरूणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या.) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू होती पण,महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत.मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जे वकील देण्यात आले होते.आघाडी सरकार मध्ये त्यांना बदलण्यात आले.आघाडी सरकार मराठा समाजावर अन्याय करीत आहे.खरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू असताना सरकारने लक्ष देण्याची गरज होती.पण,एका नटीच्या वादग्रस्त बोलण्याकडे सरकारने जास्त प्रमाणात लक्ष दिले.राज्य मंत्रीमंडळा मध्ये अनेक मराठा आमदार असून ही एकही मराठा आमदार,मंत्री मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करीत नाही.म्हणून येणा-या काळात संभाजी ब्रिगेड एकाही मराठा मंत्र्याला व राज्य
सरकारातील एकाही मंत्र्याला जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही.आरक्षण निर्णय होईपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये,लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन:श्च राज्य सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा याप्रश्नी संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे,माजी जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,धर्मराज सोळंके,अरूण गंगणे,लहू शिंदे, माणिकराव लाडेकर, सुरज शिंदे,गणेश क्षीरसागर,विशाल माने,सत्यप्रेम इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.