अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित नवव्या टप्प्यातील शिबीरात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार,दिनांक 12 सप्टेंबर रोजी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 52 जणांसह आजपर्यंत एकूण 517 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने पुन्हा नवव्या वेळी शनिवार,दिनांक 12 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.शिबिरास स्वारातीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे यांनी भेट दिली.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक धम्मा सरवदे,योगेश्वरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माणिक वडवणकर,बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा,राजीव गांधी पंचायतीराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,विशाल पोटभरे,श्रीकांत दहातोंडे,विजय रापतवार,दिनेश घोडके,भारत जोगदंड,जावेद गवळी,सचिन जाधव,रोहन कुरे,माऊली वैद्य,शंकर डाके,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक आदींसह इतरांची उपस्थिती होती.या शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले.नगरसेवक धम्मपाल सरवदे यांच्या प्रोत्साहनामुळे 27 जणांनी रक्तदान केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.विनय नाळपे, डॉ.रमा,डॉ.शशिकांत पारखे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तपेढीच्या रमेश तोगरे,शेख बाबा या कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले.सुरक्षित अंतर ठेवून रक्तदान करण्यात आले.
आतापर्यंत 517 जणांचे रक्तदान-राजकिशोर मोदी
आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे महसुल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात आणि आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांनी आपल्या सर्वांना आवाहन केल्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल ते 12 सप्टेंबर 2020 रोजी या कालावधीत एकूण 9 वेळा आयोजित शिबीरात मिळून आज तारखेपर्यंत एकूण 517 जणांनी रक्तदान केले आहे.शनिवार रोजी आयोजित शिबीरात रक्तदान करणा-या रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.
काँग्रेस कार्यकर्त्यांची बांधिलकी
स्वाराती रूग्णालयात वेळोवेळी रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो.सातत्याने रक्ताची गरज ही असते.अशा काळात आवश्यकतेनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रक्त संकलनासाठी सहकार्य केले.त्याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व कार्यकर्ते यांचे आभार.
―डॉ.शिवाजी सुक्रे (प्रभारी अधिष्ठाता,स्वा.रा.ती.शासकीय वैद्यकीय रूग्णालय,अंबाजोगाई.)