Last Updated by संपादक
बीड/प्रतिनिधी – मागील वीस वर्षांपासून मराठा समाज लढत आहे. कोणतंही सरकार आलं तरी फक्त घोषणा करतय मात्र आजचे सरकार असेल मागील सरकार असेल कोणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मात्र छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊनच शांत बसणार असल्याचे अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील म्हणालेत.
अंबाजोगाई शहरातील संतोष पॅलेस येथे आज दि १०सप्टेंबर रोजी दुपारी बीड जिल्हा बैठक व कार्यकारणी जाहीर करण्यासाठी आले यावे बोलत होते. यावेळी छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील,प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, मराठवाडा अध्यक्ष गोविंदराव मुळे,जिल्हाध्यक्ष विशाल श्रीरंग, जिल्हाकार्याध्यक्ष बाजीराव काळे, अशोक रोमन, साई देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शिवसेना असेल भाजपा असेल यांनी मराठा समाजाला मूक मोर्चा काढायला लावला आणि शेवटी त्यांनी मुका मोर्चा असं नाव मराठा मोर्चाला दिला. यामुळे आता मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही जावळे पाटील म्हणाले.