अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
भारत सरकारने सोमवार,दि.१४ सप्टेंबर रोजी काढलेली कांदा निर्यात बंदीची जाचक
अधिसुचना त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांना बुधवार,दिनांक 16 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी वाणिज्य मंत्रालय,भारत सरकार द्वारा सुचना क्रं.३१/२०१५-२० () काढण्यात आली.सदरील अधिसुचने मध्ये तात्काळ कांदा निर्यात बंदी करण्यात यावी.ही जाचक सुचना देण्यात आली.या अनुषंगाने दि.१४ सप्टेंबर २०२० हा संबंध भारतातील कांदा उत्पादक शेतक-यांसाठी काळा दिवस ठरलाआहे.ढासळलेली अर्थव्यवस्था,कोरोना महामारी,नेहमीचा दुष्काळ,अतिवृष्टी,नापिकी,बोगस बियाणे,कर्जबाजारीपणा,जी.एस.टी.,नोटाबंदी इत्यादी संकटांनी शेतकरी त्रासलेला आहे.त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.भारता मध्ये शेतकरी कष्ट करून उत्पन्न घेतात,आज कसा तरी कांद्याला चांगला भाव मिळत आहे.परंतू,योग्य भाव शेतक-यांना मिळत असताना शासनाच्या या अन्यायकारक निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.शेतक-यांचे मरण हेच केंद्र सरकारचं धोरण हे कांद्याची निर्तया बंदी करून केंद्र सरकारने सिध्द केले आहे.हे सरकार शेतक-यांच्या जिवावर उठले आहे.त्याचा संभाजी ब्रिगेड जाहिर तीव्र निषेध करीत आहे.तरी मा.प्रधानमंत्री महोदय यांना विनंती आहे की,कांदा निर्यात तात्काळ चालु करा अन्यथा संभाजी ब्रिगेड भारत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल.तसेच भारतातील शेतकरी रस्त्यांवर उतरल्या शिवाय राहणार नाही.त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपली राहील असा इशारा सदरील निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे,डॉ.वसंत उंबरे,अॅड.सुरज शिंदे,प्रा.अरूण गंगणे,पांडुरंग देशमुख,धर्मराज सोळंके,अंगद गायकवाड,माणिक लाडेकर,दत्ताञय गंगणे,शुभम काकडे,दत्ताञय फपाळ यांच्या स्वाक्ष-या आहेत.