अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्स पाळून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टि.एल.होळंबे आणि व्यवस्थापकीय कार्यवाह संभाजी आंबेकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टि.एल.होळंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी प्राचार्य नारायणराव चाटे यांचेसह सर्व विषयांचे विभागप्रमुख आणि कर्मचारीवृंद उपस्थित होता अशी माहीती कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी दिली आहे.