अंबाजोगाई:राम कुलकर्णी―
17 सप्टेंबर हा दिवश मराठवाड्यात स्वातंत्र्य दिवश म्हणुन साजरा केला जातो . निजाम राजवटी मधून मराठवाडा मुक्त झाल्या नंतर सुध्दा 50 वर्षे स्वातंत्रय दिन साजरा करण्या साठी लागली . मात्र मराठवाडयाचे सुपूत्र स्व .गोपीनाथराव मुंडे जेंव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तेंव्हा या बहाद्दर नेत्यांनी मराठवाड्यात 17 सप्टे . रोजी शासकिय ध्वजारोहन करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा पासून स्वातंत्र्य दिनाचा तिरंगा फडकू लागला . हे योगदान आणि श्रेय मुंडेना जाते .
1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र मराठवाड्याला 1948 17 सप्टेंबर रोजी खरं स्वातंत्र्य मिळालं. हैदराबादच्या निजाम राजवट मधून मराठवाडा मुक्त झाला. त्यासाठी मराठवाड्यातील भूमिपुत्रांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष, फार मोठा होता. मात्र स्वातंत्र्य जरी मराठवाड्याला मिळालं. तरी मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतच नव्हतं. कारण तिरंगा फडकवताना येत नव्हता ?शासकीय ध्वजारोहण होत नव्हतं? यासाठीसुद्धा 50 वर्ष मराठवाड्यातल्या लोकांनी संघर्ष केला. मात्र ज्यावेळी भाजपा नेते मराठवाड्याचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी मराठवाड्यात 17 सप्टेंबर रोजी शासकीय ध्वजारोहण अर्थात तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून 17 सप्टेंबरला शासकीय ध्वजारोहण होत आहे. त्यामुळे स्वातंत्रयाची प्रचिती येवू लागली . याचे संपूर्ण श्रेय गोपीनाथराव मुंडे यांना जाते. कारण हा निर्णय कदाचित त्यांनी घेतलाच नसता? तर अजूनही शासकीय ध्वजारोहण 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात करता आले नसते.? मराठवाड्याचा नेता म्हणून मुंडे साहेबांनी आपल्या मातीसाठी सत्तेत असताना. घेतलेला निर्णय ज्याची आज आठवण नव्या पिढीला होत आहे, नेत्रत्वा मध्ये धमक आणि हिमंत होती म्हणुनच त्यानी पुढाकार घेवून आपली अस्मीता जोपासण्या साठी तिरंगा फडकवण्याचा शासकिय निर्णय घेतला . मुंडे साहेब दुरदृष्टीचे नेते होते सत्तेत असतांना अनेक महत्वाचे निर्णय घेतले . सिंचन क्षेत्र वाढविण्या साठी साठवण तलाव कल्पना त्यांचीच होती जा मुळे डोंगरदऱ्यात साठवण तलाव उभा राहिले .