Last Updated by संपादक
कडा:शेख सिराज― आष्टी तालुक्यातील नगर-बीड रोड वरील म्हसोबावाडी फाटा येथील बी.एस.एन.एल सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण बंद पडले . शेतकरी व व्यापारी नेट नसल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. या गोष्टीकडे कोणी लक्ष देणार नाही. त्यामुळे न्याय मागायचं कुठं असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. याचा त्रास जवळ पंचक्रोशीतील सर्वांनाच बसला आहे. याची कुणी दखल घेणार की नाही.
हा नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागेल का नाही. अशी चर्चा नागरिकांत रंगली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात खूप अवघड आहे. आष्टी तालुक्याला कोणीच वाली नाही का?अशी भुमिका गावा-गावात पोहोचले आहे. म्हसोबावाडी ,तागडखेळ, सुलेमान देवळा ,कारखेल, उंदरखेल ,गहुखेल, येथील नागरिकांनी बी.एस.एल कंपनीचे कार्ड घेतले. मात्र त्यांना सर्विस अपुरी पडत आहे. नागरिकांकडून नेटवर्क प्रश्न कारणी लावावा.अशी मागणी होत आहे यातच ऑनलाईन शिक्षण प्रणाली संकटात सापडली आहे.