सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शासनाच्या योजनेतून वर्षभरापासून दाखल केलेल्या कर्जप्रकरणाच्या संचिकेवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या सोयगाव शाखेने अद्यापही निर्णय न घेता या उलट चकरा माराव्या लागल्याने अखेरीस अपंग तरुणाने गुरुवारपासून मराठवाडा मुक्तीदिनी सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आमखेडा येथील अपंग तरुण संदीप इंगळे यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये शासनाच्या अपंग बीज भांडवल योजनेसाठी अर्ज दाखल केला होता.परंतु सोयगाव शाखेच्या व्यवस्थापकाकडून वर्षभरात कोणताही ठोस निर्णय न देता या उलट चकरा मारण्यासाठी या अपंगाला परावृत्त केले.त्यामुळे कर्ज प्रकरणाची संचिका कचऱ्याच्या डब्ब्यात टाकल्याचा उपोषण कर्त्याला संशय गेला आहे.शासनाच्या अपंगासाठी काढण्यात बीज भांडवल योजनेचे प्रकरण मंजूर करण्यासाठी संबंधित व्यवस्थापकाच्या मनमानीमुळे या अपंग लाभार्थ्याला कागदपत्रांच्या जुळवाजुळव मध्ये खेट्या माराव्या लागल्या आहे.त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोयगावच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अपंगांना इतके वेठीस धरण्यात येते तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपोषणा दरम्यान उपस्थित झाला आहे.या व्यवस्थापकावर कारवाईसाठी सोयगाव तहसील कार्यालयासमोर मराठवाडामुक्ती दिनी संदुप इंगळे या अपंग तरुणाने आमरण उपोषण सुरु केलेले असून सुटीच्या आड पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरविल्याचा संताप व्यक्त होत आहे.