सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मुसळधार पावूस आणि घरात अंधार अशी भयानक स्थिती घोसला आणि निमखेडी या दोन गावांची शनिवारी रात्री झाली होती.त्यामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मुसळधार पावसात जीव मुठीत धरून रात्र जागून काढली होती.
जरंडी वीज उपकेंद्रातून घोसला फिडरवरून या दोन गावांना वीज पुरवठा करण्यात येतो,परंतु शनिवारी अचानक रात्री आठ वाजेनंतर या परिसरात मुसळधार पावूस सुरु झाल्याने त्यात वादळी वाऱ्याचा तडाखा मोठा होता.या वादळी वाऱ्यात घोसला फिडरच्या मुख्य वीज पुरवठ्याच्या वीजतारा कवली गावाजवळ कट झाल्याने घोसला आणि निमखेडी या दोन गावांचा वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता.त्यामुळे डोक्यावर पावूस आणि घरात अंधार अशी स्थिती या दोन्ही गावांमध्ये निर्माण झाली होती.घोसला ता.सोयगाव गावात नियमित वीज पुरवठ्याच्या अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप मराठा प्रतिष्ठानचे सोपान गव्हांडे यांनी केला असून घोसला गावाच्या फिडरवर अडचणी नसून वादळी वाऱ्यात रात्रीचा बिघाड झाल्याने वीज कर्मचाऱ्यांना भीज पावसात हा बिघाड शोधणे कठीण झाले असल्या महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर यांनी सांगितले.त्यामुळे रात्रभर या गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता रविवारी मात्र पहाटे सहा वाजताच महावितरणचे कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम हाती घेवून सात वाजता घोसला गावाचा वीज पुरवठा सुरळीत केला होता.