सोयगाव दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव-बनोटी रस्त्यावरील अपूर्ण अवस्थेत पुलाचे काम असलेल्या नाल्यावरील वळण रस्ता पुरात व्याप्त झाल्याने रात्रीच्या अंधारात बनोटीकडून येणारे प्रवाशी पुरात अडकल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघडकीस आला पहाटे पर्यंत या वळण रस्त्यावरील पूर ओसरला नसल्याने रविवारी अनेक वाहनधारकांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर कवली गावाजवळ सार्वजनिक विभागाचा अपूर्ण अवस्थेत काम रखडलेला पूल आहे.या पुलाचे तब्बल १२ वर्षापासून काम रखडले आहे.एक तपापासून या पुलाचे काम रखडलेले आहे.याचे ठोस कारणही सार्वजनिक विभाग सांगत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.या पुलाच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाच्या बाजूने असलेल्या रहदारीच्या वळण रस्त्यावर रात्रीच्या मुसळधार पावसात नाल्याला आलेली पुराने वळण रस्ता पुरात बुडाला परंतु रात्रीच्या अंधारात या पाण्याचा अंदाज न आल्याने काही प्रवाशांचे वाहने अडकली होती.तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने हि वाहने पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली होती.या रखडलेल्या नळकांडी पुलाचे काम पुन्हा लॉकडाऊन पूर्वी सुरु झाले होते त्यासाठी पुलाच्या कामाजवळ यंत्र सामुग्री आणण्यात आली परंतु अचानक काम पुन्हा बंद पडले याबाबत मात्र कोणतेही ठोस कारण संबंधित विभागाकडून सांगण्यात येत नाही.
या पुलाच्या वळण रस्त्याला रात्री आलेला पूर रविवारी पहाटे सुरूच होत त्यामुळे पहाटे वाहनधारकांना पाण्यातून प्रवास करावा लागला.शेतातून जाणाऱ्या मजुरांना पायी गुडघे पर्यंत पाण्यातून शेती कामांना जावे लागले आहे.
सोयगाव- बनोटी रस्त्यावरील या पुलाचे काम बारा वर्षापासून रखडले असल्याने बनोटीकडे जाण्यासाठी या रखडलेल्या पुलामुळे तब्बल एक तपापासून बारा वर्षापासून वळण रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सार्वजनिक विभागाच्या जाचामुळे प्रवाशांच्या डोक्याचा हा वळण रस्त्याचा प्रवास अद्यापही माथी आहे.