सोयगाव दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आठवडाभरापासून साखळी तुटलेल्या सोयगाव तालुक्यात शनिवारी व रविवारी दोन दिवसात झालेल्या ६३ चाचण्यात १५ रुग्ण सकारात्मक आढळून आले त्यामुळे आरोग्य विभागाची अचानक सापडलेल्या रुग्णांमुळे धावपळ उडाली होती.त्यामुळे जरंडी कोविड केंदाची संख्या एकवरून आता १८ वर पोहचली आहे.त्यापैकी एक महिला रुग्णाचा कोरोनामुक्त झाल्याने सुटका करण्यात आली आहे.
सोयगाव तालुक्यात आठवडाभरापासून कोरोना संसर्गाची साखळी तुटली होती,परंतु वाढत्या संसर्गाची चिन्हे आता दिसू लागली असून शनिवारी व रविवारी या दोन दिवसात सोयगाव,जरंडी,किन्ही,धनवट, कंकराळा आणि तिखी या गावांमध्ये १५ रुग्णात वाढ झाली असून जरंडी कोविड केंद्रात एक रुग्ण संख्या असतांना तब्बल १८ रुग्णसंख्या पोहचली आहे.तालुका आरोग्य विभागाकडून योग्य खबरदारी घेत कोरोना संसार्गावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले असतांना अचानक शनिवारी व रविवारी झालेल्या अंटीजन चाचण्यात पुन्हा कोरोना संसर्गाने डोकेवर काढल्याने १८ रुग्ण आढळले,जरंडी कोविड केंद्रात कोविड अधिकारी डॉआनंद भाले,अतुल नवले,प्रिया रावूत,सुप्रिया मेश्राम,वर्षा शेळके,आदी पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत आहे.