सोयगाव तालुका | औरंगाबाद:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडी ता.सोयगाव येथील भारत संचार निगम लि.मनोऱ्यात शनिवार पासून अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवसापासून जरंडी परिसरातील दहा गावांना भारत संचार निगम लि च्या सेवेपासून वंचित राहावे लागत असून या दहा गावातील १२६८ शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन धडे ठप्प झाल्याने ऐन कोरोना मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आधीच शाळा बंद आणि त्यातच ऑनलाईन शिक्षण बंद यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.याबाबत बी.एस.एन.एल च्या वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक श्री इंगळे यांचेशी संपर्क साधला असता,त्यांनी मनोऱ्याला जोडणी केलेल्या वीज पुरवठा स्टेबल होत नसल्याचे कारण सांगून महावितरणवर टोलवाटोलवी केली असून महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर यांचेशी संपर्क साधला असता रात्री दहा वाजताच जरंडीचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे मनोऱ्याला सुरळीत वीज पुरवठा होत असल्याचे पुष्टी त्यांनी दिले आहे.