बीड जिल्हा काँग्रेस आयोजित शिबिरात ; 38 जणांचे रक्तदान ― राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित दहाव्या टप्प्यातील शिबीरात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार,दिनांक 18 सप्टेंबर रोजी काँग्रेस पदाधिकारी सरफराज भाई मिञमंडळ आणि मुनीर शहा मिञमंडळाचे सदस्य तथा 38 काँग्रेस कार्यकर्ते यांचेसह आजपर्यंत एकूण 555 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने पुन्हा दहाव्या वेळी शुक्रवार,दिनांक 18 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,सय्यद सरफराज सय्यद मुमताज अली,मुनिर शहा,राजीव गांधी पंचायतीराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिनेश घोडके,महेश वेदपाठक आदींसह इतरांची उपस्थिती होती.या शिबीरात सरफराज भाई मिञमंडळ आणि मुनीर शहा मिञमंडळाच्या 38 सदस्यांनी रक्तदान केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी अस्लम शेख,सय्यद इम्रान,रक्तपेढीचे प्रमुख डॉ.विनय नाळपे,डॉ.रमा यांचे मार्गदर्शनाखाली रक्तपेढीच्या तंञज्ञ शशिकांत पारखे,रमेश तोगरे,प्रिया गालफाडे, शेख बाबा,रामदासी या कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले.सुरक्षित अंतर ठेवून रक्तदान करण्यात आले.

आतापर्यंत 555 जणांचे रक्तदान-राजकिशोर मोदी

===================
आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे महसुल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात आणि आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांनी आपल्या सर्वांना आवाहन केल्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल ते 18 सप्टेंबर 2020 रोजी या कालावधीत एकूण 10 वेळा आयोजित शिबीरात मिळून आज तारखेपर्यंत एकूण 555 जणांनी रक्तदान केले आहे.शुक्रवार रोजी आयोजित रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणारे काँग्रेस कार्यकर्ते सय्यद सरफराज सय्यद मुमताज अली आणि मुनिर शहा यांचेसह सहभागी सर्व रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार काँग्रेस कार्यकर्ते आणखी रक्तदान करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.

स्वा.रा.ती प्रशासनाकडून स्वागत

==================
स्वाराती रूग्णालयात दररोज 25 ते 30 रूग्णांना रक्ताची गरज असते.कोरोना काळात तर रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो.सातत्याने रक्ताची गरज ही असते.कोरोना संसर्गामुळे सामान्य लोक रक्तदान करण्यासाठी घाबरत आहे.अशा काळात
आवश्यकतेनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन काळात सातत्याने रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रक्त संकलनासाठी सहकार्य करीत आहेत हे विशेष होय.त्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व काँग्रेस कार्यकर्ते यांचे आभार मानून स्वा.रा.ती.शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.