अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संकट हे मानवाच्या मुळावर उठले आहे.प्रत्येक जीवाला याची भिती.मात्र वर्तमान काळात डॉक्टर अगदी देवदूताच्या भुमिकेत आहेत.डॉक्टरांना पण, याचा धोका आहे.मात्र ज्या कामासाठी आपला जन्म झाला ते कर्तव्य निभावत आहेत.डॉक्टरांना सुद्धा आपले दवाखाने चालवावीत का नाही.? असा प्रश्न आहे.मात्र सामाजिक जाणिव ठेवून धारूरचे भुमीपूत्र डॉ.अविनाश ज्ञानोबा मुंडे हे मॅक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून 24 तास रूग्णांची सेवा करीत आहेत.हे विशेष होय.
डॉ.अविनाश ज्ञानोबा मुंडे हे कोरोना बाधीत नसलेल्या इतर रूग्णांसाठी अविरत उपलब्ध राहून देत असलेली आरोग्य सेवा ही आज मोठा दिलासा म्हणावा लागेल.कोरोना वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून कोरोना बाधीत रूग्णांची सेवा करण्यासाठी कोविड रूग्णालय सुरू करण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.अविनाश मुंडे हे मूळचे धारूर (जि.बीड) येथील रहिवासी आहेत.प्रसिद्ध डॉ.ज्ञानोबा मुंडे यांचे सुपुत्र आहेत.औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.डी.पर्यंत शिक्षण एमजीएम रूग्णालयात पूर्ण केलं.शांत आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या डॉ.अविनाश यांनी अल्पावधीतच सर्वसामान्य रूग्णांची सेवा करत अनेकांची मने जिंकली आहेत.कोरोना सारखं मोठं संकट मानवी जीवावर उठले आहे.त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.या संकटात वास्तविक पाहता डॉक्टरांची भूमिका ही देव-देवता सारखीच आहे.ज्यामध्ये खाजगी डॉक्टर रूग्णांची सेवा करतात.मात्र अनेक ठिकाणावरून तक्रार आणि संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.अशाही परिस्थितीत नवतरूण ज्यांना सामाजिक जाणीव आणि वर्तमान काळाचे गांभीर्य आहे.अशा डॉ.अविनाश मुंडे सारख्या तरूण डॉक्टरने अंबाजोगाई शहरात दीनदयाळ नागरी सहकारी बँकेसमोर,परळी रोड या ठिकाणी मॅक्स हॉस्पिटल आहे.जिथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक रूग्णसेवा दिल्या जातात.टु डी इको स्ट्रेस टेस्ट,अतिदक्षता विभाग रूग्णांना आवश्यक सोयी आहेत.शिवाय सोबत त्यांच्या पत्नी डॉ.सौ.प्रगतीताई मुंडे यांची स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण सेवा सुरू आहे. गर्भवती महिलांची सोनोग्राफी व इतर शस्त्रक्रिया देखील केल्या जात आहेत. अत्याधुनिक साधन सामग्री असल्याने रूग्णालयात आलेले सर्व प्रकारचे रूग्ण यांना सेवा दिली जाते.डॉ.अविनाश मुंडे होतकरू तरूण असून कोरोना सारख्या संकटात लोकांना ते मदत करत असल्याने त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.सर्व प्रतिबंधक उपाय रूग्णालयात पाळले जात आहेत.एकिकडे इतर शहरांत अनेक खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केलेले असताना दुसरीकडे मात्र अंबाजोगाईत अनेक डॉक्टर बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपली आरोग्य सेवा सुरू ठेवली आहे.लवकरच आपल्या दवाखान्यात कोविड रूग्णालयातील उपचार सुविधा सुरू करण्याचा विचार असल्याचे डॉ.मुंडे यांनी सांगितले.सर्वसामान्य रूग्णांची सेवा करणे हिच ख-या अर्थाने ईश्वराची सेवा आणि आपल्या वडीलांकडुन वारसा मिळाल्याचे ते म्हणाले.धन्वंतरीच्या दरबारात वैद्यकीय दूत म्हणून काम करणा-या तरूण डॉ.अविनाश मुंडे यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार हे त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू आहेत.डॉ.बिराजदार हे सामाजिक दायित्व आणि गरीबांचा देव म्हणून वैद्यकीय क्षेत्रात ओळखले जातात.शिक्षण घेत असल्यापासून त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद तसेच डॉ.नितीन चाटे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे डॉ.अविनाश मुंडे यांनी सांगितले आहे.