अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या हुतात्म्यांचे बलिदान नव्या पिढीने विसरू नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रनाना खेडगीकर यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ,बेथूजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ,बेथूजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने मुक्ती संग्रामातील शहीदांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.दिलीप खेडगीकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.डी.एच.थोरात हे होते.कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने लागू असलेल्या सर्व सुचनांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल,स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ.दिलीप खेडगीकर यांनी मराठवाडा ही संतांची भूमी तर आहेच परंतू, बलिदान करणा-या शुरविरांची व महापुरूषांची ही भूमी असल्याचे ते म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान देणा-या हुतात्म्यांविषयी त्यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले.प्रतिष्ठाणचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून मराठवाड्यातील जनतेला संघटीत करण्याचे कार्य महाराष्ट्र परीषद यशस्विरित्या पुर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.या प्रसंगी प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी स्वतंत्र देशात आणखीन एक स्वतंत्र संस्थान असू शकत नाही.ही बाब सहन करण्यापलिकडची होती.मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी विविध आंदोलने झाली.या आंदोलनाचा शेवट सशस्त्र लढ्यात झाला.लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.त्यांच्या सोबत नारायण रेड्डी,सिराज अल हसन पिरामिजी,कृष्णाचार्य जोशी,डॉ.मेलकोटे,दगडाबाई शेळके,आनंदीबाई जोशी,आ.कृ.वाघमारे,अनंतराव भालेराव,उद्धवराव पाटील,राघवेंद्र दिवाण,पंडीत नरेंद्रजी,विनायकराव चारठाणकर,शामराव बोधनकर,अच्युतराव बोधनकर,विजयेंद्र काबरा,दिगंबरराव शिवणगीकर,देवीसिंह चव्हाण,चंद्रगुप्त चौधरी,माणिकचंद पहाडे,शंकरराव चव्हाण,भाई शामलालजी,आण्णासाहेब गव्हाणे, श्रीनिवास बोरीकर,चंद्रशेखर बाजपायी, गोविंदराव पानसरे,गोविंदलाल बाहेती,शामराव शिवणगीकर, साहेबराव बारडकर,वि.वा.देवूळगावकर, चंद्रकी,केशवलू,पी.व्ही.नरसिंहराव, गोविंदभाई श्राफ,भाऊसाहेब वैशंपायन,बाबासाहेब परांजपे,प्रभाकर वाईकर,श्रीनिवास खोत आदींनी सहभाग घेतला.प्रसंगी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचे प्रा.चौधरी धर्मापुरीकर यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोप डॉ.डी.एच.थोरात यांनी केला.या प्रसंगी नायब तहसीलदार राडीकर,प्रा.गंगाधर चव्हाण,श्रीधर काळेगांवकर,मधुकर बाभुळगावकर,आदित्य ठोंबरे,बिभीषण अंबाड,वसंत दहिवाळ आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठाणच्या वतीने प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी पुढाकार घेतला.