कडा:शेख सिराज― आष्टी तालुक्यातील उंदरखेल परिसरामध्ये पावसाने अतोनात नुकसान केले. एक गोष्ट नक्की शिकवली जिद्द असावी तर शेतकर्यासारखी… पोटच्या पोरासारखी संभाळलेली पिकं खराब झाली आहेत. “तोंडात घास आणि मानेत मुक्का “अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली. शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरात संघर्ष चालु. माझा बळीराजा रोज थकतो हरतो पण दिवस उगवला की पुन्हा डोळे पुसून लढायला तयार होतो. सलाम ते शेतकऱ्याचे जिद्दीला. सततच्या झडीमुळे कांदा पिकाचे खूप नुकसान त्यावर वारंवार रोग पडत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.शेतात उभा असलेल्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोम फुटुन सोयाबीन खराब झाली. अति पावसामुळे नुकसानाचा वेगळाच प्रकार समोर आला. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. शेतकऱ्या वर वारंवार संकटावर संकट. गेल्या महिन्यातील तोडणीला आलेल्या मुगाच्या शेंगाला कोम फुटुन नुकसान झाले. येत्या चार-पाच दिवसात सोयाबीन काढणी ला. सुरुवात होणार होणार होती. मात्र दहा-बारा दिवसांपासून पावसाची झड लागल्याने सोयाबीन काढणी ला विलंब झाला. त्यामुळे शेंगांना कोम फुटले.अक्षरशा पावसाने सोयाबीन पिका ची वाट लावली. शेतकऱ्या कडुन नुकसान भरपाईची मागणी होत आहे.