उसतोड कामगारांचा प्रश्नावर परदेशातून सौ.पंकजाताईची कडवी नजर
कामगारांचा संप हक्कासाठी , राजकिय दुकाने चालवण्यासाठी नाही
मुंबई:आठवडा विशेष टीम― भाजपा नेत्या तथा उसतोड कामगाराच्या कैवारी माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ह्या सध्यस्थितीत मुलाच्या अॅडमिशन साठी परदेशात आहेत . तरीसुध्दा जो उसतोडणी कामगार त्यांचा आत्मा आहे . त्या कामगारांच्या प्रश्नावर त्यांची परदेशातून किती कटाक्ष नजर आहे हे काल दिशून आले , भारतिय वेळेनुसार पहाटे पाच वाजता उठून त्यांनी राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक बैठकित व्हिडिओ कॉन्फरंन्स द्वारे हजेरी लावून कामगारांच्या प्रश्नावर ठोस भुमीका मांडली . माझ्या कामगारांना सन्मान जनक मजुरी वाढवून इतर प्रश्न सोडवा . अन्यथा कोयता उसाच्या फडात जाणार नाही असा खणखणीत इशारा परदेशातून दिला
राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.
संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही तथा राजकारणाचे दुकाना चालवण्यासाठी नाही तो माझा आत्मा आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे या संपात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्यांसाठी
पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या असल्याचे समजते. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मनी ध्यानी एकच ध्यास
उसतोड कामगाराच कल्याण
गोपीनाथरावजी मुंडे यांनी संपूर्ण आयुष्य ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी घालवल. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंकजाताई कामगारांच्या कल्याणासाठी ध्यानी मनी एकच ध्यास ,ऊस तोड कामगारांचे कल्याण ,याप्रमाणे त्यांची भूमिका? जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, तरी ऊसतोड कामगार हेच आपले दैवत. त्यासाठी त्यांनी परदेशातून साखर संघाच्या बैठकीत घेतलेली ठोस भूमिका, आणि मांडलेले प्रश्न बरच काही सांगून जाते. येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे, असं म्हटलं तरी चालेल.