बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांचे लॉकडाऊन मधील काम अभिमानास्पद ― प्रदिप नागरगोजे

पाटोदा:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांनी लॉकडाऊनच्या काळत केले काम कौतुकास्पद आहे,प्रितम ताई जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतः 24 तास उपलब्ध होत्या,जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना कारखान्यावरून घरी परत येण्यासाठी खासदार मदत केली ज्या जिल्ह्यात कामगार अडकले असतील त्या जिल्ह्यातील कलेक्टरशी बोलून त्यांच्या जेवण्याच्या व राहण्याची वेवस्था करण्याचे प्रशासनाला सूचना केल्या, बीड जिल्ह्यात कामगाराचे आगमन झाल्यावर बीड जिल्ह्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मास्क / सेनेटायजर चे वाटप करण्यात आले, जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढतोय हे लक्षात येताच कोविड काळात जिल्ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून 200 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर आणले, सवतः कोविड सेंटनला भेट देऊन आरोग्य व्यस्थेचा आढावा घेतला, कोविड पोस्टिव्ह असलेल्या रुग्णांशी रुगांची चौकशी केली, व कोरोनाच्या संकट काळात अतिशय अभिमानास्पद कार्य कारनाथ कोविड योध्याशी चर्चा करून त्यांचे कौतुक केले, जुलै महिन्यात पाटोदा
येथे खासदार डॉ प्रीतमताईनी पाटोदा तालुक्यातील व्यापारी व डॉक्टरांची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती, या बैठकीत पाटोदा येथील डॉक्टरनी पाटोदा येथे कोविड तपासणी सेंटर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात चालून करावं अशी मागणी करण्यात याली होती, ताईंनी बीड जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांसशी चर्चा करून पुडील दोन दिवसात लगेच पाटोदा येथे कोविड तपासणी सेंटर सुरू झाले, या सह अनेक काम खासदार प्रीतमताईनी कोरोनाच्या काळातलं केले. बीड जिल्ह्यतील जनतेची काळजी असलेली खासदार बीड जिल्ह्याला लाभला आहे, ताईसाहेब आपण जिल्ह्यासाठी अहोरात्र काम करत आहेत, आपण केलेले काम जनता काहीच विसरणार नाही.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.