आष्टी:अशोक गर्जे―
सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील सर्वत्र मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे.कापुस ,तूर, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा यांनी पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी यांच्या कडून करण्यात येत आहे. पीक विमा भरून घेऊन विमा कंपनी गायब झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसान होऊन पंचनामे नाहीत, कधी होणार पंचनामे ? तत्काळ पंचनामे होवेत व शेतकरी यांना मदत मिळावी.