कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील कढाणी साठवण प्रकल्प तब्बल चार वर्षानंतर पुर्ण क्षमतेने भरला. शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. उंदरखेळ आष्टी तालुक्यातील कमला नदी यावर्षी जुन पासुनच पावसाने चांगली साथ दिल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. कढाणी साठवन प्रकल्पाच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पामुळे उंदरखेल, सुलेमान देवळा, हिवरा-पिंपरखेड या परिसरातील पिण्याचे पाणी व शेतीचा प्रश्न मार्गी लागला. दिनांक 22 सप्टेंबर रात्री अडीच ते तीनच्या सुमारास प्रकल्पाच्या सांडी वरून पाणी पडले. प्रकल्पाच्या खालील गावांमध्ये नदी दुथडी भरून वाहत आहे. नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ह्या अचानक झालेल्या पावसाने प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला. पंचक्रोशीतील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला आहे.