पोषण अभियान निमित्ताने अंबाजोगाई तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून 25 सप्टेंबर रोजी चित्रकला व पोषण आहार ज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
समग्र शिक्षा,जिल्हा परिषद,बीड पोषण अभियाना अंतर्गत पोषण माहे सप्टेंबर- 2020 च्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परीषदेच्या शाळांमधून चिञकला व पोषण आहार ज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन शुक्रवार,दिनांक
25 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना पोषण आहाराबाबत जाणीव जागृती निर्माण होऊन आरोग्य सुदृढतेसाठी प्रयत्नशील
होण्यासाठी आपण ही संधी उपलब्ध करून देत आहोत तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने दोन्हीही स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी यांनी केले आहे.

चित्रकला स्पर्धेचे स्वरूप :-

1) तिसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संधी खुली आहे,2) विद्यार्थी स्वतःच्या घरी बसूनच चित्र काढतील,3) चित्र काढण्यासाठी ए-4 साइज पांढ-या कागदाचा प्राधान्याने वापर करावा,4) चित्राची गरज पाहून कागद आडवा किंवा उभा धरावा,5) चित्र रंगवण्यासाठी उपलब्ध असलेले पारदर्शक अथवा अपारदर्शक रंगांचा वापर करता येईल,6) चित्र निर्मिती ही दिलेल्या विषयाला अनुसरून असावी,7) चित्र विहित मुदतीत पाठविणे अनिवार्य आहे.(सॉफ्ट कॉपी),
8) ही विद्याथ्यांची परीक्षा नसून ज्ञान/मनोरंजनाची एक संधी आहे.क्रमांक निवडीसाठी जिल्हास्तरावर चित्रकला शिक्षक यांची समिती असेल त्यांचा निर्णय अंतिम राहील,9) चित्राच्या उजव्याबाजूस
1) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नांव,2) शाळेचे नांव,
3) केंद्राचे नांव,4) तालुका, 5) वर्ग, 6) संपर्कासाठी पालकांचा मोबाइल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.ही माहिती लिहिलेली नसल्यास स्पर्धेतून बाद ठरवण्यात येईल.
10) घरातच उपलब्ध असलेल्या साहित्याचाच वापर करावा कुठल्याही परिस्थितीत चित्र कलेचे साहित्य
खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.शिवाय चित्राला 1/2 से.मी : ची मार्जिन ठेवणे आवश्यक आहे.गट
पहिला-वर्ग तिसरी ते चौथी,विषय-माझ्या आवडीचे फळ/फळभाजी,गट-
दुसरा वर्ग पाचवी ते सहावी,विषय-फळांची टोपली / विविध खाद्यपदार्थाची डीश,गट तिसरा-वर्ग सातवी ते आठवी,विषय- संतुलित आहाराचे ताट / शाळेतील परसबाग.गट
चौथा- वर्ग नववी ते दहावी,विषय-बाजारातील दृश्य / हॉटेल मधील दृश्य असे आहे.

तालुका समन्वयकांची जबाबदारी :-

=================
1) या स्पर्धेमध्ये प्रत्येक केंद्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक / शिक्षक व इतरांमार्फत पाठपुरावा करावा.2) प्रत्येक केंद्रातून प्रत्येक वर्गाचे सर्वोत्कृष्ट एक चित्र या प्रमाणे (प्रत्येक केंद्रातून तिसरीचे एक, चौथीचे एक याप्रमाणे तिसरी ते दहावीपर्यंत चित्र प्राप्त करणे) Soft Copy, 3) वरीलप्रमाणे प्राप्त केलेले सर्व चित्र (प्रत्येक केंद्रातील आठ याप्रमाणे तालुक्यातील केंद्राची संख्या X 8 चित्रे) तालुका समन्वयकाने मागवून द्यावीत व ही चित्रे 23 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आपणांस दिलेल्या गुगल लिंक वर पाठवून देणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुका समन्वयकाने छाननी करून उत्कृष्ट प्रत्येक इयत्तेतील एक याप्रमाणे 08 चित्रे पाठवून दयावीत, 4) या सर्व चित्रावर नांव, शाळा,केंद्र,तालुका, संपर्क क्रमांक नमूद असल्याची खात्री करावी, 5) स्पर्धेमध्ये तालुका / जिल्हा स्तरावर निवडण्यात आलेल्या प्रथम /द्वितीय / तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना जिल्हा कार्यालयाकडून डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.ते विद्यार्थ्यांना पाठवणे.
6) अ.क्र. / केंद्राचे नांव / चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी संख्या ही माहिती अंबाजोगाई तालुका समन्वयक मधुकर सुवर्णकार (मोबाईल क्रमांक-9420330122) यांना पाठवावे.सहभागी विद्यार्थी (आपले चित्र वर्ग शिक्षकांना पाठवतील),वर्ग शिक्षक (प्राप्त चित्रे केंद्र प्रमुखांना पाठवतील),केंद्रप्रमुख (वर्ग शिक्षकांकडून प्राप्त चित्रे तालुका समन्वयक अधिकारी यांचेकडे पाठवतील),तालुका समन्वयक (प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक इयत्तेतून एक अशी आठ चित्रे व यादी जिल्हा समन्वयकाला देतील),जिल्हा समन्वयक (प्राप्त सर्व चित्रे परिक्षकांकडे देऊन ते शिक्षणाधिकारी व मा.मु.का.अ.यांच्या नियंत्रणात तपासून घेऊन अंतिम निकाल निश्चित करतील) तसेच पोषण आहार य ज्ञान प्रश्न मंजुषेसाठी आहारातील घटक,त्यातील समावेशक पोषणतत्ये, पोषणमुल्यांच्या
अभायी होणारे रोग, पोषणमूल्यांच्या आधिक्यामुळे होणारे रोग,इ.चा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करवून घेणे फायदेशीर ठरेल.1) जिल्हास्तरावरून प्रश्नमंजुषा तीन गटांत घेण्यात येणार आहे,2) यात जिल्हास्तरावरून तीन गटसाठी तीन वेगवेगळ्या लिंक तयार केलेल्या असतील.या लिंक तालुका समन्ययकाला पाठवण्यात येतील त्यांनी त्या केंद्रप्रमुखांमार्फत.विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करावयाची आहे,3) प्रश्न मंजुषेत असणारे प्रश्न वैकल्पिक स्वरूपाचे असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील.त्यापैकी योग्य पर्याय निवडल्यास विद्यार्थ्यांना गुण प्राप्त होणार आहेत, 4) अॅन्ड्राइड मोबाइल, मोबाईलचे नेटवर्क,मोबाईलची चार्जिंग इ आवश्यक बाबींची सूचना आपल्या स्तरावरुन
देण्यात याव्यात, 5) विद्यार्थ्यांनी प्रश्नावली सोडवल्यावर सबमीट करणे आवश्यक आहे.6) पोषण आहार ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेतून प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात येतील, 7) विद्यार्थ्यांना लिंक प्राप्त झाल्यावर त्यात विचारलेली संपूर्ण माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे तसेच सर्व प्रश्नही
सोडवणे आवश्यक आहे.प्रश्न मंजुषा घेण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पोषण आहाराबाबत जाणीव जागृती करणे हे आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे,9) स्पर्धेच्या दिलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी ही लिंक गटशिक्षणाधिकारी/समन्ययक यांना पाठविण्यात येईल
त्यांनी 15 मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती भरण्यासाठी पाठवणे आवश्यक आहे,10) या प्रश्न मंजुषेमध्ये मराठी व सेमी माध्यमासाठी एकच लिंक देण्यात आलेली असून प्रत्येक प्रश्न व त्यांचे पर्याय मराठी व इंग्रजी भाषेतून देण्यात आलेले आहेत.पोषण आहार ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा दि.25/09/2020 रोजी होणार आहे.तरी विद्यार्थ्यांना 10.30 वाजता स्पर्धेसाठी तयार रहाणे आवश्यक आहे.तालुका समन्वयकावर पुढील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तालुका समन्वयकाला दि.25/09/2020 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता तीन वेगवेगळ्या गटासाठी तीन लिंक प्राप्त होतील.त्या लिंक त्यांनी सर्व केंद्रप्रमुखामार्फत शिक्षकांना पाठवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे,तालुका समन्वयकाने सकाळी 10.30 वाजता केंदप्रमुखांना लिंक पाठवून द्यावी तसेच केंद्रप्रमुखाने लिंक प्राप्त झाल्या की लगेच शिक्षकांमार्फत आपल्या केंद्रातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे.तालुका समन्वयकाने लिंक सर्वांपर्यंत पोहोचली आहे.याची खात्री करावी.तसेच वेळेचे बंधन पाळावे,एका मोबाईलवरून एकाच विद्यार्थ्याला प्रश्नमंजुषेत सहभागी होता येईल याची नोंद घ्यावी.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी यांनी केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.