काँग्रेस पक्षात गोविंद पोतंगले,पांडुरंग देशमुख यांच्यासह अनेकांचा जाहीर प्रवेश ;बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले स्वागत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गोविंद पोतंगले,पांडुरंग देशमुख यांच्यासह अनेकांनी मंगळवार,दिनांक 22 सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला.काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी स्वागत केले आहे.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,पांडुरंग देशमुख,गणेश कुकडे,प्रल्हाद कुकडे,मगरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य परसराम मगर,शिवाजी भोसले,अमोल साठे,श्रीधर मगर,गोविंद साठे यांचेसह अनेकांनी जाहीर प्रवेश केला.हा पक्ष प्रवेश सोहळा सहकार भवन,प्रशांतनगर,अंबाजोगाई येथे मंगळवार,दिनांक 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण हे उपस्थित होते.यावेळी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या सर्वांचे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या प्रसंगी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,गोविंद पोतंगले यांनी मागील काही वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रांत बांधिलकी मानून काम केले आहे.त्यांना शेतकरी व सर्वसामान्य माणसाविषयी मोठी तळमळ आहे.त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोतंगले यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात त्यांना योग्य तो सन्मान व ताकद देण्यात येईल.त्यांच्या अनुभवाचा उपयोग काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी होईल असा आम्हाला विश्वास आहे.काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष गोविंद पोतंगले यांनी सांगितले की,देशाला आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची व काँग्रेसच्या विचारधारेची मोठी गरज आहे.त्यामुळे मी व माझे सहकारी आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत सामील झालो आहोत.जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम प्रामाणिकपणे करू अशी ग्वाही पोतंगले यांनी यावेळी दिली.

काँग्रेस पदाधिकारी यांच्या निवडी

==================
बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करताच गोविंद पोतंगले यांची काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी तर पांडुरंग देशमुख यांची काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.नुतन पदाधिकारी यांच्या नियुक्तीचे सर्वञ स्वागत होत आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.