सोयगाव दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मुसळधार पावसात गाव पुरवठ्याच्या रोहीत्राला शोर्ट सर्किटमुळे आग लागून मोठा आवाज झाल्याची घटना घोसला ता.सोयगाव गावात मंगळवारी सायंकाळी घडली.या घटनेमुळे मात्र गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे पुन्हा मंगळवारीही घोसला ग्रामस्थांना मंगळवारची रात्र अंधारात काढण्याची नामुष्की ओढविली होती.
सोयगाव परिसरात मंगळवारी अचानक मुसळधार पावसाने तडाखा दिला होता.या मुसळधार पावसात घोसला गावातील गाव पुरवठ्याच्या रोहीत्राला अचानक आग लागून मोठा भडका उडाला होता.या आवाजामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते.घोसला गावाचा ऐन पावसात वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून मुसळधार पावसात अंधारात राहावे लागले रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
आगीचे लोळ दिसताच धावपळ-
मुसळधार पावसात रोहीत्राला लागलेल्या आगीच्या लोळ पाहून ग्रामस्थ मात्र चक्रावले होते,त्यामुळे धावपळ उडाली होती,मुसळधार पावूस आणि रोहित्राची आग यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते.
सोयगावसह परिसराला मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने पुनः तडाखा दिला होता.पावसाचा जोर अधिक असल्याने विजांचा कडकडात आणि पावसाचा जोर यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बनोटी मंडळाला रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावूस सुरूच होता त्यामुळे पुनः हिवरा नदीच्या पुराची भीती ग्रामस्थांच्या मनात घर करून होती.