‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहीमेची अंबाजोगाईत सुरूवात
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहीमेची अंबाजोगाईत सुरूवात झाली आहे.शहरातील घरोघरी जावून पथकाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.तरी आपल्या घरी येणा-या आरोग्य पथकाला अंबाजोगाईकर जनतेने सहकार्य करावे असे आवाहन
अंबाजोगाई शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,सर्वपक्षीय गटनेते,सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी गणेश सरोदे यांनी केले आहे.
अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालयाचे वतीने नागरिकांना कळविण्यात येत आहे की,‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहीमेची अंबाजोगाई येथे सुरूवात झाली आहे.कोविड १९ नियंत्रणासाठी व कोविड १९ मुळे होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम अंबाजोगाई शहरात दिनांक १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० व १४ ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधी पर्यंत दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.अंबाजोगाई शहरामध्ये ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.एखादी व्यक्ती आजारी अथवा आजार सदृश्य लक्षणे आढळल्यास मोहिमेसाठी निश्चित केलेल्या पथकाकडून कोविड १९ आजराविषयीची भीती दूर करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.ताप,खोकला,दम लागणे,एसपीओ 2 कमी असणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना जवळच्या उपचार केंद्रात (फेवर क्लिनिक) मध्ये संदर्भित करण्यात येईल.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम नगरपरिषद अंबाजोगाई,तालुका आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. मुख्याधिकारी गणेश सरोदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे व आरोग्य अधिकारी यांच्या दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहिमेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.शहरस्तरावर एकून १४ प्रभागांमध्ये डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी,शिक्षक इत्यादींचे पाच ते सात सदस्यांचे प्रभागनिहाय पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकासोबत नगरपरिषद सदस्य यांनी सुचवल्याप्रमाणे एक पुरूष व एक स्त्री स्वयंसेवक यांना निश्चित करण्यात येणार आहे.शहरातील नागरिकांनी ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यासाठी सहकार्य करावे व या मोहिमेच्या माध्यमातून तपासणी करण्याकरिता पुढे यावे असे अवाहन अंबाजोगाई शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी,भाजपाच्या गटनेत्या सौ.संगीता दिलीपराव काळे,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या सौ.राजश्री अशोक मोदी,सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी गणेश सरोदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.या बैठकीसाठी न.प.कर्मचारी,आरोग्य विभागातील कर्मचारी,शिक्षक,आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते.
अंबाजोगाईकरांनी सहकार्य करावे
================
कोविड १९ नियंत्रणासाठी व कोविड १९ मुळे होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम अंबाजोगाई शहरात दिनांक १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० व १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधी पर्यंत दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.अंबाजोगाई शहरामध्ये ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.एखादी व्यक्ती आजारी अथवा आजार सदृश्य लक्षणे आढळल्यास मोहिमेसाठी निश्चित केलेल्या पथकाकडून कोविड १९ आजराविषयीची भीती दूर करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.ताप,खोकला,दम लागणे,एसपीओ 2 कमी असणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना जवळच्या उपचार केंद्रात (फेवर क्लिनिक)मध्ये संदर्भित करण्यात येईल.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम नगरपरिषद अंबाजोगाई,तालुका आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.तरी ही मोहीम यशस्वी आणि अंबाजोगाई कोरोना मुक्त करण्यासाठी अंबाजोगाईकरांनी नेहमीप्रमाणेच नगरपरिषदेस सहकार्य करावे.
-राजकिशोर मोदी (गटनेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,नगरपरिषद,अंबाजोगाई.)