बीड/आष्टी:अशोक गर्जे― रोज होणाऱ्या सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. कापुस ,तूर, सोयाबीन कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत.अनेक वेळा मागणी करूनही पंचनामे होत नाहीत अशी मागणी शेतकरी यांच्या कडून करण्यात येत आहे.
विमा मंजूर झाला पाहिजे व सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी.अस्मानी संकटाच्या वाईट परिस्थितीत सरकार ने मदत करावी. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकर आदेश द्यावेत , नुकसान होऊन अद्याप देखील पंचनामे करण्यात आलेले नाहीत.पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळायला हवी.