पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना विषाणूमुळे जगभरात संताप व्यक्त केला जात असताना माञ पाटोदा तालुक्यातील आरोग्य विभागातील महिला कर्मचारी नायगाव आरोग्य केंद्रा मध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती काळे ह्या कोरोनाला हारवण्याच्या लढाईत रात्रंदिवस झगडत आहेत.स्वतःच्या जिवाची काळजी न घेता, इतरांचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.ज्योती काळे ह्या महिला कर्मचारी असताना देखील कुटुंबाप्रमाणेच ते आपल्या सेवेलाही तितकेच महत्त्व देतात आपल्या कामामुळे कुटूंबाला धोका निर्माण होऊ नये म्हणून व देशावर आलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामनाही केला पाहिजे म्हणून आपण जी आरोग्य सेवा करत आहोत तिही केली पाहिजे. त्यांची ड्युटी पाटोदा क्वारंटाईन सेंटरला (विलगिकरण कक्ष) असल्यामुळे काही दिवस कुटुंबाला गावाकडेच सोडून त्या एकट्याच पाटोदा शहरात राहत आहेत. पाटोदा क्वारंटाईन सेंटर गावाच्या एकदम बाहेर असून चारही बाजूने डोंगर आहेत. कोंविड सेंटर कडे जायला चांगला रस्ताही नाही, रस्त्यावर कुठे लाईटची सोय नाही. जिकडे जाण्यास दिवसा माणुस घाबरतो तिकडे त्या दिवस राञं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ड्युटी करून रुग्णांची सेवा करतात. यामुळे पाटोदा तालुक्यातील कोविड लढवय्यांपैकी ज्योती काळे ह्या एक अग्रदुत आहेत जी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे रक्षण करण्याचे काम करत असतात.
स्वतासाठी तर सर्वच जगतात दुसऱ्यासाठी थोडे जगले पाहिजे उद्याच्या गोष्टी सोडा उद्या बोला नवीन युगात नवीन कथा एकत्र लिहा आपण भारतीय आपण भारतीय कोणतेही संकट टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो संघर्ष करणे.
―पाटोदा आरोग्य कर्मचारी
ज्योती काळे