अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील पू.स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने शहीद भगतसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी कै.शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ.अंगदराव फड यांच्या हस्ते शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.प्रतिष्ठाणचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.या प्रसंगी प्रा.डॉ.अंगदराव फड यांनी शहीद भगतसिंह यांच्या कार्याविषयी आपले विचार मांडले.यावेळी श्रीधर काळेगावकर,दयानंद देशमुख,वसंतराव दहिवाळ,अरूणराव दैठणकर आदींची उपस्थिती होती.कोविड-19 चे पालन करून सदर कार्यक्रम घेण्यात आला.प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी पुढाकार घेतला.